Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : पाणी उपसाबंदी नियोजनाचा फेरविचार करण्याची मागणी

Team Agrowon

Kolhapur News : ‘उपसाबंदीच्या नियोजनाबाबत येत्या जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेऊन नियोजन करण्यात येईल. तसेच राज्यात दुष्काळाची स्थिती असल्याने शेतीसाठी पाणी जपून वापरावे.

शेतकऱ्यांना धरणातील पाणीसाठ्याची माहिती वेळोवेळी देण्यात येईल,’ असे आश्वासन जलसंपदा विभागाच्या कोल्हापूर विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी दिले. उपसाबंदीच्या नियोजनाचा फेरविचार करण्याची मागणी इरिगेशन फेडरेशनने केली.

इरिगेशन फेडरेशन पाणीपुरवठा संस्था पदाधिकाऱ्यांनी उपसाबंदीच्या नियोजनावर आक्षेप घेत उपसाबंदी रद्द करावी, यासाठी जलसंपदा विभागाशी चर्चा केली. इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील- किणीकर म्हणाले, की धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस झाला आहे.

राधानगरी शंभर टक्के भरले आहे. २८ टीएमसी क्षमतेच्या कळम्मावाडी धरणात मागील वर्षी १९ टीएमसी पाणीसाठा होता. यंदा २२ टीएमसी साठा सध्‍या आहे. या धरणाला गळती आहे म्हणून कमी भरले आहे. या धरणाची गळती काढण्यासाठी निधी मंजूर करावा लागेल. त्यानंतर निविदा काढावी लागेल.

त्यानंतर गळती काढण्याचे काम सुरू होईल. मात्र या सर्व प्रक्रियेबाबत अजूनही चित्र अस्पष्ट आहे. अशात धरणातील उपसा जोरात सुरू आहे. गेल्या वर्षीच्या मानाने यंदा नोव्हेंबर महिन्यात एक टीएमसी पाणी जादा वापरावे लागले. राधानगरी व दूधगंगा धरणाचे पाणी वापरले गेले. ऊस आंदोलनामुळे लांबलेली ऊस तोडणी त्यामुळे उसाला जादा पाणी लागले आहे. उपसाबंदी नियोजनाचा फेरविचार करावा.

‘एक ते तीन दिवस उपसाबंदी असेल. तिथून पुढे उरलेले १७ दिवस उपसा सुरू होईल. वीस दिवसांचा एक फेरा पूर्ण झाला की पुन्हा परत तीन दिवस उपसाबंदी १७ दिवस सुरू, असे फेरे घेतले जातील. अशा नियोजनावरही बैठकीत चर्चा झाली. यात शेतकऱ्यांनी शनिवारी, रविवारी, सोमवारी हे तीन दिवस उपसा बंदीत घ्यावेत.

यातील सोमवारी वीजपुरवठा बंद असतो. शेतीला पाणी या दिवसात वापरले जात नाही. त्यामुळे पाण्याची बचत होईल व शेतकऱ्यांचीही सोय होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. उन्हाळ्यात पाणी कमी पडता कामा नये. जूनपर्यंत पाणी शेतीसाठी पुरले पाहीजे, याची जबाबदारी जलसंपदा विभागाने घ्यावी, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

त्याच पद्धतीने नियोजन करू, असे माने यांनी सांगितले. माजी आमदार संजय घाटगे, बाबासाहेब देवकर, राजू सूर्यवंशी, भारत पाटील भुयेकर, सुभाष शहापुरे, चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT