Baramati News : सासवड येथील साईनाथ आईस फॅक्टरीला वीजचोरी प्रकरणात आकारलेला ३५ लाख ८६ हजारांचा दंड भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करता येणार नसल्याचे बजावत जिल्हा न्यायालयाने साईनाथ आईस फॅक्टरीचा वीज पूर्ववत जोडून देण्याचा अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
सासवड येथे असलेल्या साईनाथ आईस फॅक्टरीची वीजचोरी ६ एप्रिल २०२२ रोजी उघडकीस आली होती. त्यावेळी या फॅक्टरीला २ लाख ३४ हजार २४३ युनिटची चोरी केल्याबद्दल ३५ लाख ८६ हजारांचा दंड आकारला होता. त्याबाबत व वीजपुरवठा जोडून देण्याबाबत फॅक्टरीचे मालक श्री. नारायण दगडू पवार यांनी दिवाणी न्यायालयात अर्ज केला होता. दिवाणी न्यायालयाने बिल कायम ठेवले.
त्यांनतर श्री. पवार यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली. यामध्ये आरोपीला काही काळ अटक सुद्धा झाली होती. जिल्हा न्यायालयातही ‘महावितरण’ने आकारलेला दंड भरावाच लागेल. दंडाची रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा जोडून देता येणार नसल्याचे न्यायालयाने सांगितले.
एक प्रकरण न्यायालयात अन् दुसरी चोरी
दरम्यान, संबंधित प्रकरण न्यायालयात असताना फॅक्टरीने दुसऱ्यांदा मीटर बायपास करून वीजचोरी केली. ‘महावितरण’च्या पुणे येथील भरारी पथकाने १५ मार्च २०२३ रोजी ही वीजचोरी उघडकीस आणली. तेव्हा या ग्राहकाला पुन्हा २२ लाख ३२ हजारांचा दंड आकारला.
ही रक्कम ग्राहकाने भरली, मात्र पहिल्या चोरीतील दंडाची रक्कम अद्याप पूर्ण भरलेली नाही. त्यामुळे संपूर्ण रक्कम भरली जात नाही, तोपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करता येणार नसल्याचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन ग्राहकाचा अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणी ‘महावितरण’तर्फे ॲड. सचिन खंडागळे व ॲड. गणेश डिंबळे यांनी बाजू मांडली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.