Crop Loan  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Compensation : नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी

Team Agrowon

Washim News : तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस व गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जावी अशी मागणी करण्यात येत आहे.

वादळी वारा व गारपिटीने शेतामध्ये असलेले गहू, हरभरा, ज्वारी, संत्रा फळबागांसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. या वर्षभरात शेतकरी सातत्याने नैसर्गिक आपत्तींना सामोरा जात आहे.

दुसरीकडे बाजारपेठेत शेतमालाचा दर घसरलेला आहे. यातून उत्पादन खर्च भागवणेसुद्धा कठीण झाले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतातील गहू, हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील गहू खाली पडला. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

- पुरुषोत्तम चव्हाण, शेतकरी, शिवणी, जि. वाशीम

आमच्या गावामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. मोठे वृक्ष उन्मळून पडले. नागरिकांच्या घरांवरील टीनपत्रे उडून गेले आहेत. घरात ठेवलेले सोयाबीन ओले झाले. शेतात रब्बीतील पिके, भाजीपाला फळबागा उद्ध्वस्त झाल्या. त्यामुळे संपूर्ण गाव आर्थिक संकटात सापडले आहे. शासनाने आम्हाला आर्थिक मदत द्यावी.

- मंगेश सावके, सरपंच, शेवती, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT