C P Radhakrishnan  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांच्या मदतीची मागणी

Heavy Rain Crop Loss : सततच्या पावसामुळे शेतामध्ये सोयाबीनच्या झाडाला शेंगा लागलेल्या नाहीत तसेच कपाशीच्या झाडांची वाढ झाली नाही व शेतात पावसाचे पाणी थांबल्यामुळे पिके करपून गेली आहेत.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामामध्ये सततच्या पावसामुळे अंदाजे पाच लाख एकर सोयाबीन व कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतामध्ये सोयाबीनच्या झाडाला शेंगा लागलेल्या नाहीत तसेच कपाशीच्या झाडांची वाढ झाली नाही व शेतात पावसाचे पाणी थांबल्यामुळे पिके करपून गेली आहेत.

त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांचे आर्थिक साह्य करावे, अशी मागणी काँग्रेसच्य शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत केली. अकोला जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता. ४) रात्री येथे भेट घेटली.

शेतकऱ्यांनी यापूर्वी सोयाबीनला शेंगा नसलेली झाडे जिल्हाधिकाऱ्यांना आणून दिली होती. जिल्हा कृषी अधीक्षकांची सुद्धा भेट घेतली. याबाबत काँग्रेसने तेल्हारा तथा बाळापूर तहसील कार्यालयावर शेतक-यांसमवेत मोर्चा काढून निवेदन दिले होते. श्री. अमानकर यांनी सरकारचे लक्ष वेधण्याकरता अन्नत्याग सत्याग्रह केला.

परंतु शासनाचा याबाबतीत कुठलाही सकारात्मक प्रतिसाद नाही, असे निदर्शनास आणून दिले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संवेदनशील अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व राज्य शासनाला अंदाजे पाच लाख एकर शेती नुकसानीचा पंचनामा करण्याची परवानगी मागितली.

परंतु नुकसान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या नियमांमध्ये बसत नसल्यामुळे काँग्रेसच्या मागणीप्रमाणे अकोला जिल्हा प्रशासनाने विशेष बाब म्हणून पंचनामे करण्याची परवानगी राज्य शासनाला मागितलेली आहे. परंतु अ‌द्याप शासनाचा कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही, असेही राज्यपालांना सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT