Crop Damage Compensation : शेतीपिकांच्या नुकसानीपोटी ५४८ कोटींच्या निधी वितरणास मंजुरी

Heavy Rain Crop Loss : यंदा १ ते १९ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे परभणी जिल्ह्यात ८३४ गावातील ५ लाख २९ हजार ७६१ शेतकऱ्यांच्या ४ लाख २ हजार १२३ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याचे पंचनाम्यानंतर स्पष्ट झाले आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : यंदाच्या (२०२४) सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी परभणी जिल्ह्यातील ५ लाख २९ हजार ७६१ बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरिता ५४८ कोटी ५९ लाख ८९ लाख रुपये निधी वितरणास महसूल व वनविभागाने शुक्रवारी (ता. ४) काढलेल्या शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे.

यंदा १ ते १९ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे परभणी जिल्ह्यात ८३४ गावातील ५ लाख २९ हजार ७६१ शेतकऱ्यांच्या ४ लाख २ हजार १२३ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याचे पंचनाम्यानंतर स्पष्ट झाले आहे. त्यात सर्व नऊ तालुक्यातील जिरायती पिकांचे ४ लाख १ हजार ८८.५५ हेक्टर, पाथरी तालुक्यातील बागायती पिकांचे ६७३ हेक्टर, जिंतूर, पाथरी, गंगाखेड तालुक्यातील फळपिकांचे ३६१.५० हेक्टर नुकसान झाले आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : वादळाच्या नुकसानीची भरपाई मिळेना

नुकसान झालेल्या जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपयानुसार ५४५ कोटी ४८ कोटी ४हजार २१२ रुपये, बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी २७ हजार रुपयेनुसार १ कोटी ८१ लाख ७१ हजार रुपये, फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी ३६ हजार रुपयेनुसार १ कोटी ३० लाख १४ हजार रुपये मिळून एकूण ५४८ कोटी ५९ लाख ८९ हजार २१२ रुपये निधी मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती.

Crop Damage
Crop Damage Compensation : नांदेडला नुकसानग्रस्तांसाठी ८१२ कोटींची मागणी

बाधित शेतकऱ्यांना जास्तीजास्त ३ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येईल. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीची रक्कम बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळती करु नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना सूचना निर्गमित कराव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत.

जमिनी नुकसानीसाठी ३ कोटीवर निधीची गरज ..

नदी, नाल्यांनी प्रवाह बदल्यामुळे परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ तालुक्यातील २२ गावातील १ हजार ५१३ शेतकऱ्यांची ७७३.७२ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. त्यांच्या मदतीसाठी ३ कोटी ६३ लाख ६४ हजार ८४० रुपये तर ९४ शेतकऱ्यांच्या १९.९० हेक्टरवरील जमा झालेला गाळ, दगडगोटे, मुरूम हटविण्यासाठी ३ लाख ५८ हजार २०० रुपये निधी आवश्यक आहे, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com