Tur Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Procurement: तूर खरेदीस १५ दिवसांच्या मुदतवाढीची मागणी

MSP Extension: राज्यातील तूर खरेदीस अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने नोंदणीकृत शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी व्हावी, यासाठी पणन विभागाने केंद्र सरकारकडे १५ दिवसांची मुदतवाढ मागितली आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: राज्यातील तूर खरेदीला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने पणन विभागाने तूर खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. १३ मे रोजी ९० दिवसांची मुदत संपत असून १५ दिवसांची मुदतवाढ मागितली आहे.

राज्यात एक लाख ३७ हजार ४५८ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी झालेली असून, त्यापैकी ५२ हजार ९७१ शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आली आहे.या शेतकऱ्यांकडून ७७ हजार ५३ टन तूर खरेदी करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरेदी प्रक्रियेसाठी ९० दिवसांची मुदत १३ मे २०२५ रोजी संपत आहे.

उर्वरित नोंदणीकृत शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी होण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आहे. ही मागणी लक्षात घेता १३ मे २०२५ पासून पुढे १५ दिवसांची मुदतवाढ केंद्र सरकारने वाढवून द्यावी, अशी विनंती पणन विभागाने केली आहे.

केंद्र सरकारने राज्याला सन २०२४ -२५ हंगामात ‘पीपीएस’अंतर्गत २ लाख ९७ हजार ४३० टन तूर खरेदीला मंजुरी दिलेली आहे. त्याकरिता नाफेड व ‘एनसीसीएफ’ या केंद्रीय नोडल संस्थांच्या माध्यमातून राज्यातील आठ राज्यस्तरीय नोडल संस्थांमार्फत ७६४ खरेदी केंद्र राज्यात कार्यान्वित आहेत.

त्या खरेदी केंद्रात आतापर्यंत ५२ हजार ९७१ शेतकऱ्यांकडून ७७ हजार ५३ टन तूर खरेदी करण्यात आली आहे. राज्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून ७७५० रुपये हमीभावाने तुरीची खरेदी चालू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT