Tur Procurement: तूर खरेदीचे चुकारे रखडले

MSP Payment Delay: राज्यात हमीभावाने विकलेली तूर अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचलेली नाही. यंत्रणांतील तांत्रिक अडचणींचा बळी ठरलेला शेतकरी आर्थिक गरजांनी त्रस्त झाला आहे.
Tur Procurement
Tur ProcurementAgrowon
Published on
Updated on

Akola News: राज्यात हमीभावाने सुरू असलेल्या तूर खरेदीचे २९ मार्चपासून चुकारे थकित असल्याचे शेतकरी सांगत आहेत. काही शेतकऱ्यांना मध्यंतरी मॅसेज पाठविण्यात आले. मात्र चुकारे जमा झालेले नसल्याचा प्रकार समोर आलेला आहे. यंत्रणेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने चुकाऱ्यांची प्रक्रिया रखडल्याचे कारण अधिकारी देत आहेत.

या हंगामात बाजारपेठांमध्ये दर कमी असल्याने शेतकरी शासनाला हमीभावाने (७५५०) तूर विक्री करीत आहेत. राज्यात आतापर्यंत ‘नाफेड’ने ५ लाख १५ हजार क्विंटलपर्यंत तर ‘एनसीसीएफ’ने १ लाख ४४ हजार क्विंटलपेक्षा अधिक खरेदी केली. दोन्ही संस्था मिळून साडेसहा लाख क्विंटलपेक्षा अधिक तुरीची खरेदी झाली आहे. मार्च एण्ड नुकताच आटोपला आहे.

Tur Procurement
Tur Procurement : तूर खरेदीचा साडेपाच लाख क्विंटलचा टप्पा पार

अशा स्थितीत या खरेदी केलेल्या शेतीमालाचे चुकारे गेले महिनाभर मिळालेले नसल्याने शेतकरी चिंतातुर झालेले आहेत. अनेकांना सध्या पैशांची तातडीची निकड तयार झालेली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून काही शेतकऱ्यांचे चुकारे झालेले नाहीत. मध्यंतरी काही शेतकऱ्यांना चुकाऱ्यांबाबत संदेश मिळाले. काहींना रकमा आल्या तर बरेच शेतकरी अद्याप प्रतीक्षा करीत आहेत.

सरकारकडून हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे पैसे अजूनही अनेक खात्यात जमा झालेले नाहीत. खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन कुणाचा एक महिना, कुणाला १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. चुकारे मिळालेले नसल्यामुळे तीव्र नाराजी पसरली आहे. शासनाने यंदा प्रति क्विंटल ७५५० हमीभाव जाहीर करून तूर खरेदी सुरू केली.

Tur Procurement
Tur Procurement : तुरीचे दोन कोटी ३ लाख रुपयांवर चुकारे अदा

या वर्षी खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तूर विक्री केली. दरम्यान, काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, वेळेवर माल विकून, सर्व कागदपत्रे पूर्ण केली, तरीही त्यांना पैसे मिळालेले नाहीत. आगामी हंगामासाठी खते, बियाणे, मजुरीसाठी पैशांची निकड आहे. यंत्रणांनी याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे.

मुदतवाढीची मागणी

तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना नावनोंदणी मुदत बुधवारी (३० एप्रिल) संपुष्टात आली. बाजारपेठांमध्ये तुरीचा दर हमीभावाच्या आत मिळत असल्याने व शेतकऱ्यांचा शासकीय खरेदीकडे असलेला ओढा पाहता तूर नोंदणीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी यंत्रणास्तरावरून शासनाकडे झालेली आहे. यापूर्वी दोन वेळा नावनोंदणीला मुदतवाढ देण्यात आली होती.

हमीभावाने शासनाच्या केंद्रावर नऊ मार्चला ४ क्विंटल ७८ किलो तूर विक्री केली आहे. त्यानंतर पुन्हा २४ मार्चला तूर विक्री केली आहे. या दोन्ही वेळच्या चुकारे मला मिळालेले नाही. आता लग्नसराईची धामधूम सुरू असून यासाठी पैशांची गरज आहे. माझ्यासारखे अनेक शेतकरी चुकाऱ्यांची प्रतीक्षा करीत आहोत.
निंबाजी लखाडे, तूर विक्रेता शेतकरी, खुदनापूर, ता. मेहकर, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com