Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : पावसाअभावी पेरणीत अडथळे

Kharif Season : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पाऊस झाला. त्यामुळे मशागती लवकर केलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्याही लवकर उरकल्या.

Team Agrowon

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पाऊस झाला. त्यामुळे मशागती लवकर केलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्याही लवकर उरकल्या. मात्र आता काही दिवसांपासून पावसाने उसंत दिली असून पेरणीत अडथळे येत आहे. पिकांची वाढ खुंटत असून त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

जिल्ह्यात खरिपाचे ७ लाख १६ हजार २०९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. आतापर्यंत ६ लाख ४१ हजार ९१९ (८९.६३ टक्के) पेरणी झाली आहे. यंदा मेमध्ये तब्बल २२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जून महिन्यातही मृग जोरदार बरसला.

जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पेरण्या वेगात सुरू होत्या. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात पीक करपू लागल्याची स्थिती होती. अजून कोठेही दुबार पेरणीची स्थिती नाही. मात्र पावसाअभावी बाजरी, कापसाची वाढ थांबली आहे.

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात मूग, उडीद आणि तुरीचे क्षेत्र वाढते हे ठरलेले असते. यंदा मात्र हे क्षेत्रही फारसे वाढलेले दिसत नाही. आतापर्यंत उडदाची ६० हजार ३०८ हेक्टरवर, मुगाची ४२ हजार ८९४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तुरीची पेरणी सरासरीच्या ८५.३४ टक्के झाली आहे. कापसाची लागवडही सरासरीच्या ७५ टक्के झाली आहे.

पेरणी (हेक्टर) कंसात सरासरी क्षेत्र

भात ः ६१५० (१८७४५)

बाजरी ः ५३,७९२ (८९,६२९)

मका ः ९२,९३१ (७७,९९९)

तूर ः ६४,८५५ (६४ हजार ५८५)

मूग ः ४८,४५३ (५१ हजार ९८०)

उडीद ः ६५,२३६ (६७ हजार ५९५)

भुईमूग ः ३,९८३ (६ हजार ५९९)

सोयाबीन ः १,६८,७११ (१ लाख ७८ हजार ५०६)

कापूस ः १,३३,२४६ (१ लाख ५५ हजार ३२९)

यंदा माॅन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने पाच एकरांत जवळपास दहा ते बारा बॅग कपाशी लागवड केली आहे‌. तसेच माळरानाची शेतजमीन असल्याने कपाशी सुकू लागली आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
- संभाजी लोढे, शेतकरी, मजलेशहर, ता. शेवगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly: आमदारांच्या कार्यकर्त्यांना विधिमंडळ परिसरात बंदी; अध्यक्षांचा निर्णय

Crop In Crisis : निलंग्यात ८० हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

Jal Jeevan Mission : लातूर जिल्ह्यातील गावागावांतील ‘जल जीवन’ला घरघर

Agrowon Podcast: बेदाण्याचे दर तेजीत, काकडीला मागणी, चिकू महागला; बाजरीचे दर स्थिर, तुरीचे दर दबावात

Flood Management : महापूर येऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या?

SCROLL FOR NEXT