Kharif Sowing : पावसाच्या दडीमुळे पेरणी अजूनही साठीतच

Kharif Season : जून महिना उलटून जुलै महिनाही अर्धा सरला. मात्र, तालुक्यात पावसाने दडी मारल्याने फक्त ६३ टक्केच पेरणी पूर्ण झाली आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Beed News : जून महिना उलटून जुलै महिनाही अर्धा सरला. मात्र, तालुक्यात पावसाने दडी मारल्याने फक्त ६३ टक्केच पेरणी पूर्ण झाली आहे. जी पेरणी करण्यात आली पण शेतकऱ्यांनी नाईलाजाने पाऊस पडेल या आशेवर केलेली आहे. आता केलेल्या पेरणीमध्ये काही ठिकाणी उगवण झाली, तर काही भागांत दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.

परळी तालुक्यात कधी नव्हे ते मे महिन्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे पावसाळ्याप्रमाणे वातावरण झाले होते. अनेक नद्या, नाले, ओढे भरून वाहिले. मात्र, उन्हाळ्यात पाऊस पडला तो पावसाळ्यात पडणार की नाही ही धास्ती शेतकऱ्यांना होती. मग पुढे मॉन्सून वेळेच्या अगोदर दाखल झाला.

Kharif Sowing
Kharif Sowing: पुणे विभागात खरिपाचा ८९ टक्के पेरा

मराठवाड्यातील अनेक भागांत पाऊस जोरदार पडला, पण परळी तालुका मात्र अपवाद ठरला. मात्र, जून महिन्यात एकही दिवस पाऊस पडला नाही. जुलै महिन्याचा पंधरवडाही झाला आहे. तरीही पावसाचा पत्ता नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा मृग नक्षत्रात पेरणी करता आली नाही, परिणामी कडधान्याचे पीक घेता आलेले नाही. काही शेतकऱ्यांनी मे महिन्यात पडलेल्या पावसावरच धाडस करून पेरणी केली, अनेकांची पिके उगवलीही. मात्र, पाऊस न पडल्याने आता वाढ खुंटली आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : धाराशिवमध्ये उडीद, कांदा लागवडीला प्राधान्य

तालुक्यातील काही भागांत दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. तालुक्यात एकूण पेरणीयोग्य क्षेत्र ५८ हजार ५११ हेक्टर आहे. मात्र, आतापर्यंत फक्त ६३ टक्के पेरणी पूर्ण झाली. तालुक्यातील मुख्य पीक सोयाबीन, कापूस, तूर आहे. काही प्रमाणात खरीप ज्वारी, बाजरी, मका, मूग, उडीद व तीळ या पिकांचा समावेश आहे.

खरिपाचे पीक-पेरणी क्षेत्र-झालेली पेरणी (हेक्टरमध्ये)

सोयाबीन ३२७३४ २७९२९

कापूस १८१९३.६० १०९३७

तूर ३४७४ २३८२

खरीप ज्वारी १४२२ ३६

बाजरी ११७३ १२४

मका ३०१ ४८

मूग ९०६ ४३७

उडीद २०३ ७४

तीळ ३९ २२

पुढील कालावधीत साधारणपणे संकरीत बाजरी, सोयाबीन व तूर, बाजरी व तीळ, सूर्यफूल, एरंडाची लागवड व पेरणी करावी. कापूस व भुईमूग, संकरीत ज्वारी घेऊ नये. ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये.
-कारभारी पौळ, तालुका कृषी अधिकारी, परळी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com