Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Level : शिराळा तालुक्यातील पाणीसाठ्यात घट, सात तलाव कोरडे

Water Shortage : शिराळा तालुक्यातील ४९ पाझर तलावांच्या पाणीसाठ्यात तीव्र उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली आहे.

Team Agrowon

Sangli News : शिराळा तालुक्यातील ४९ पाझर तलावांच्या पाणीसाठ्यात तीव्र उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली आहे. ४९ पाझर तलावांपैकी एका तलावातील पाण्याची पातळी ९० टक्के असून ७ तलाव कोरडे ठणठणीत आहेत. ६ तलावांत ५० टक्के पाणीसाठा आहे.

उन्हाची दाहकता व तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने धरण, विहिरी, कूपनलिका यांच्या पातळीत घट झाली आहे. एका महिन्यात २२ पैकी १६ पाझर तलावांची पाणीपातळी १५ ते २० टक्के घटली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढू लागली आहे.

वाकुर्डे योजनेच्या पाण्याने हातेगाव, अशिलकुंड तलावात केवळ सर्वाधिक ९० टक्के पाणीसाठा आहे. तालुक्यातील अन्य तलावातील पाणीसाठा असा : खिरवडे तलावात ६० टक्के पाणीसाठा आहे. मेणी (साकृंबी नाला), आटूगडेवाडी (मेणी), कापरी, इंग्रुळ, लादेवाडी, वाडीभागाई या ६ पाझर तलावांत ५० टक्के पाणीसाठा आहे.

बिऊर तलावात ४५ टक्के पाणीसाठा आहे. गवळेवाडी (भैरखोरा), पाचुंब्री या दोन तलावांत ४५ टक्के पाणीसाठा आहे. शिरसटवाडी तलावात ३५ टक्के पाणीसाठा आहे. येळापूर, चव्हाणवाडी, धामवडे (कुंडनाला), शिरशी (कासारकी), भैरेवाडी, पं. त. शिराळा नंबर २, पाडळी, पाडळीवाडी, करमाळे नंबर २, बेलदारवाडी, पावलेवाडी नंबर २ या पाझर तलावांत ३० टक्के पाणीसाठा आहे.

चरणवाडी नंबर १, सावंतवाडी, गवळेवाडी (उंदीरखोरा), कोंडाईवाडी नंबर १ व २ , पं. त. शिराळा नंबर १, बादेवादी (वाकुर्डे बुद्रुक), भटवाडी, खेड, रेड क्रमांक २, पावलेवाडी नंबर १ या १२ पाझर तलावांत ३० टक्के पाणीसाठा आहे. शिरशी (भैरवदरा), शिरशी (कालेखिंड), वाकुर्डे बुद्रुक (जामदार, वाकुर्डे) खुर्द, अंत्री खुर्द, करमाळा नंबर १, तडवळे नंबर १, तडवळे (वाडदरा) या ८ पाझर तलावांत २० टक्के पाणीसाठा आहे.

‘वाकुर्डे’च्या पाण्याने साठ्यात वाढ

हात्तेगाव (अशीलकुंड), खेड, बेलदारवाडी, कापरी, इंग्रुळ या ५ पाझर तलावांत वाकुर्डे योजनेतून पाणी सोडल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे.

तलाव कोरडे ठणठणीत

हात्तेगाव (अंबाबाईवाडी), शिवारवाडी, निगडी (महारदरा), निगडी (खोकडदरा), निगडी (जुना), भाटशिरगाव, शिरशी नंबर १ हे ७ पाझर तलाव कोरडे पडले आहेत.

मानकरवाडी तलावातील पाण्याची पातळी खालावल्याने या परिसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कडक उन्हामुळे पिके वाळू लागली आहेत. वाकुर्डे योजनेतून पाणी मानकरवाडी तलावात सोडले व उपसाबंदी मागे घेतली, तर पिकांना जीवदान मिळेल.
रघुनाथ धुमाळ, माजी सरपंच, आंबेवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT