Dam Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Water Level : कोल्हापुरातील पाणीसाठ्यात घट

Water Storage : कोल्हापुर जिल्ह्यात या वर्षी पाऊस कमी झाला. त्यामुळे, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात असणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यापैकी या वर्षी राधानगरी, तुळशी, वारणा, कडवी आणि पाटगाव या धरणांमध्ये प्रमाणापेक्षा कमी पाणीसाठा आहे.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापुर जिल्ह्यात या वर्षी पाऊस कमी झाला. त्यामुळे, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात असणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यापैकी या वर्षी राधानगरी, तुळशी, वारणा, कडवी आणि पाटगाव या धरणांमध्ये प्रमाणापेक्षा कमी पाणीसाठा आहे. काळम्मावाडी धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत २.११ टीएमसी पाणी जास्त आहे.

मात्र काळम्मावाडी धरणाला असणारी गळती, शेती, उद्योग आणि पिण्यासाठी सोडव्या लागणाऱ्या पाण्यामुळे हे पाणीही झपाट्याने कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

जिल्ह्यात या वर्षी कमी वेळेत जास्त पाऊस झाला. त्यामुळे राधानगरी धरण अवघ्या २६ ते २९ दिवसातच भरले. मात्र, पाणलोट क्षेत्रात तीन ते चार महिने सातत्यपूर्ण अपेक्षित असणारा पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणात पावसाच्या पाण्याची जेवढी आवक होणे अपेक्षित होते तेवढी झालेली नाही.

परिणामी धरणातून भोगावती नदीमध्ये जेवढा पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तेवढ्या गतीने पाणी कमी होताना दिसत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राधानगरी धरणात ६.९१ टीएमसी पाणीसाठा होता या वर्षी तो ६.७२ टीएमसी आहे.

काळम्मावाडी धरणात गेल्यावर्षी १७.०२ टीएमसी पाणीसाठा होता, या वर्षी यामध्ये वाढ दिसत असून सध्या हाच पाणीसाठा १९.३१ टीएमसी आहे. मात्र, काळम्मावाडी धरणाला गळती असल्याने हा पाणीसाठा सातत्याने कमी करावा लागणार आहे. याच धरणाला असणाऱ्या गळतीमधून प्रति सेकंद ३६० लिटर पाणी वाया जात आहे.

राधानगरी धरणासह तुळशी, वारणा, कडवी, पाटगाव प्रकल्पातील पाणीही डिसेंबरपासूनच कमी होत असल्याने भविष्यातील टंचाई रोखण्यासाठी पाच ते सहा महिने पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा सध्या तरी पुरेसा आहे. मात्र हे पाणी काटकसरीने कसे वापरता येईल. जास्ती-जास्त घटकांना याचा कसा फायदा होईल, याचे नियोजन केले जात आहे.
स्मिता माने, अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

Wetland Ecosystems: पाणथळ सृष्टी व्यवस्थेचे विश्व

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

SCROLL FOR NEXT