Kalammawadi Dam : काळम्मावाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न मिटणार, ८० कोटींचा निधी मंजूर

Hasan Mushrif : काळम्मावाडी धरणाची गळती काढण्यासाठी ८० कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
Kalammawadi Dam Kolhapur
Kalammawadi Dam Kolhapuragrowon
Published on
Updated on

Kalammawadi Dam Leakage : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अस्मिता असलेल्या काळम्मावाडी धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. दरम्यान या गळतीमुळे दिवसाला लाखो रुपये पाणी वाया जात आहे. या धरणाची गळती काढण्यासाठी ८० कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय मान्यतेवर सही केली आहे. या निधीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

काळम्मावाडी धरणाची साठवण क्षमता २५.४० टीएमसी आहे. परंतु मोठ्या प्रमाणात लागलेल्या गळतींमुळे तो साठा १९.६८ टीएमसी इतका कमी ठेवावा लागायचा.

या धरणातून प्रत्येक सेकंदाला साडेतीनशे लिटर हिशोबाने दररोज तीन कोटी लिटर्स एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी गळतीमधून वाया जातेय. मोठ्या प्रमाणातील गळत्यांमुळे धरणाच्या बांधावर दाब येऊ नये म्हणून पाणी सोडून दिल्यामुळे धरणात फक्त सहा टीएमसी इतका अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला होता.

Kalammawadi Dam Kolhapur
Raju Shetti VS Hasan Mushrif : '४०० चे गणित सांगण्यास कागलमध्ये आलोय', पालकमंत्री हसन मुश्रीफांना राजू शेट्टींचे आव्हान

शेतीच्या पाणीटंचाईसह पिण्याच्या पाणीटंचाईलाही जिल्ह्याला तोंड द्यावे लागले. पुढच्या पावसाळ्यापर्यंत गळती काढण्याचे काम पूर्ण झाल्यास येणाऱ्या पावसाच्या हंगामात काळम्मावाडी धरण पूर्ण म्हणजे २५.४० टीएमसी इतक्या क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

त्यामुळे साहजिकच शेतीसह पिण्यासाठीही मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच कोल्हापूर शहरासाठी दिवाळीपासून सुरू होत असलेल्या थेट पाईपलाईनद्वारे २४ तास पाणी पुरवठा होईल, असेही पत्रकात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com