Nashik News : जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून पावसाने जोर धरला असून मालेगाव तालुक्यात ४ हजार हेक्टरवर मका व कापूस पिकाचे नुकसान झाले होते. तर गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम पट्ट्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात प्रामुख्याने इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा तालुक्यात पावसाने जोर धरला आहे. १५ महसूल मंडलांत अतिवृष्टीची झाली असून पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. .पश्चिम पट्ट्यात घाट माथ्यावर अतिवृष्टी झाल्याने नदी नाल्यांना पूर आला. यात इगतपुरी तालुक्यात १०७ मिमी पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे. तालुक्यात भात लागवडी व भाजीपाला पिके पाण्याखाली गेली आहेत. .Heavy Rainfall: नांदेड, वाशीम जिल्ह्यांना फटका.मुसळधारेने बुधवारी (ता.२०) संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, नाशिक, निफाड व दिंडोरी या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील १८ धरणातून विसर्ग सुरू असून तो टप्प्याटप्याने वाढविण्यात आला आहे..गुरूवार (ता. २१) रोजी पश्चिम पट्ट्यातील धरणातून विसर्ग वाढवल्याने नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सुरु असलेला ४५ हजार ७६६ क्युसेक्स विसर्ग हा सकाळी १० वाजता ३,१५५ क्युसेक्सने वाढ करून एकूण ४८ हजार ९२१ क्युसेक्स गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. .Sangli Rainfall : दुष्काळी भागातील पिकांना पाऊस ठरतोय उपयुक्त.तर पावसाचा जोर वाढल्याने निसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे नाशिक पाटबंधारे विभागाने कळविले आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नांदगाव तालुक्यातील कळवाडी महसूल मंडळात १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान झालेल्या पावसाने १२ गावे झोडपले. तर आता पश्चिमपट्ट्यात इगतपुरी तालुक्यात पावसामुळे भात लागवडी अडचणीत सापडल्या आहेत..या महसूल मंडळात अतिवृष्टीउंबरठाणा (६९), बाऱ्हे (६९), मनखेड(६९), सुरगाणा(५९), खोकरी (६९), ननाशी (६९), इगतपुरी (१०७.३), घोटी (१०७.३), वाडीवऱ्हे (९३), नांदगाव (९३), टाकेद (९३), धारगाव (९८.५), कोहोर (६९.३), त्र्यंबकेश्वर (७२.५), वेळुंजे (७२.५), दहाडेवाडी (७२.५)..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.