Agriculture Technology : भविष्यातील शेतीकडे जाताना...

Future Agriculture : कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण आणि भविष्यवेधी उपक्रमांविषयी चर्चा करू.
Future Agriculture
Future Agriculture Agrowon
Published on
Updated on

Innovative and Futuristic Initiatives in Agriculture Sector : कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण आणि भविष्यवेधी उपक्रमांविषयी चर्चा करू. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेला २०४७ मध्ये शंभर वर्ष पूर्ण होतील. या महत्त्वाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत भारत देश हा विकसित देश होण्याचे लक्ष्य मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. या उपक्रमाची सुरुवात सोमवार (ता. ११ डिसेंबर) रोजी ‘विकसित भारत @ २०४७ : युवकांचा आवाज’ या नावाने करण्यात आली.

एखादा देश विकसित आहे की नाही, यासाठी जे काही आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक निकष लावले जातात, त्यांची पूर्तता करण्यासाठी भारताला फार मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण सध्या सुरू असलेल्या आर्थिक विकासाच्या गतीने आपण चालत राहिलो तर हे लक्ष्य २०४७ पर्यंत कदापि पूर्ण होणार नाही. हे लक्ष गाठण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रचंड मोठी झेप घ्यावी लागणार आहे.

सध्या सुरू असलेल्या काही उपक्रमांना बळकटी द्यावी लागेल, तर काही नवीन उपक्रम हाती घ्यावे लागतील. आता नवीन उपक्रम कोणते असतील, या संदर्भात विचार करण्याची आवश्यकता आहे. या लेखामध्ये आपण कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण आणि भविष्यवेधी उपक्रमांविषयी चर्चा करू.

कारण आपल्याला ‘विकसित भारत@२०४७’ हे देशाचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर ज्या क्षेत्रावर सर्वाधिक लोकसंख्या अवलंबून आहे, अशा कृषी क्षेत्रावर सर्वाधिक भर द्यावा लागणार आहे.

एकूण आर्थिक विकासाचा दर हा ९ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक राखण्याची आवश्यकता आहे. या ध्येयाचा विचार केला असता कृषी क्षेत्राचा आर्थिक विकासाचा दर सध्या फारच कमी आहे. याच क्षेत्रामध्ये आपल्याला प्रचंड काम करावे लागणार आहे, या बाबत सर्व धुरिणांमध्ये नक्कीच एकमत होईल.

Future Agriculture
Agriculture Technology : संवेदकांप्रमाणे कार्य करणारी वनस्पती विकसित

शेती क्षेत्रा पुढील महत्त्वाची उद्दिष्टे

विविध आकडेवारीनुसार सध्या साधारणपणे १४ कोटी कुटुंबे शेतीमध्ये कार्यरत आहेत. अंदाजे ६० टक्के लोकसंख्या शेतीच्या विविध बाबींशी संबंधित आहे. भारताच्या एकंदर क्षेत्रफळ सुमारे १६० दशलक्ष हेक्टर पैकी साधारणतः ५० टक्के क्षेत्रावर शेती केली जाते.

म्हणजेच जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या आहाराची गरज पुरविण्याचा भार पेलतानाच त्याही पलिकडे जाण्याची आवश्यकता आहे.

हरितक्रांतीनंतर आजपर्यंत भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालेली आहे. एकेकाळी विकसित देशांनी पुरवठा केलेल्या अन्नधान्यांवर अवलंबून राहण्याच्या नामुष्कीपासून सद्यपरिस्थितीत स्वावलंबित्वाकडे केलेली वाटचाल ही नक्कीच आशादायक आहे.

आता आपण आपल्या लोकसंख्येची गरज भागवून जरुरी भासल्यास आपत्कालीन परिस्थितीत अन्य देशांना अन्नधान्याचा पुरवठा करू शकतो, इतकी मोठी झेप आपल्या शेतकऱ्यांच्या बळावर आपण घेतली आहे. अर्थातच, यामध्ये अन्‍य अनेक बाबींसोबत सदर कालावधीमध्ये विकसित झालेल्या कृषी तंत्रज्ञानाचे महत्त्वाचे योगदान आहे.

विकसित देशांच्या यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी आपल्याला कृषी तंत्रज्ञानाद्वारे पुढील गोष्टी साध्य कराव्या लागतील. २०४७ मध्ये भारताची लोकसंख्या अंदाजे १६४ कोटी असेल. म्हणजे सध्याच्या अंदाजे १४२ कोटी लोकसंख्येमध्ये सुमारे २२ कोटींची भर पडलेली असेल. या कालावधीमध्ये वाढत जाणाऱ्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज व योग्य तितक्या पोषणमूल्यासह भागविण्यासाठी कृषी तंत्रज्ञानाचा विकास करावा लागणार आहे.

विकसित देश या नामाभिधानासोबतच काही जबाबदाऱ्याही आंतरराष्ट्रीय पातळीवर घ्याव्या लागतात. उदा. आपत्कालीन परिस्थितीमध्ये अन्य देशांच्या अन्नधान्यांच्या गरजेची जबाबदारी घेण्याची क्षमता आपल्या देशामध्ये निर्माण करावी लागेल.

आपल्या देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य आणि शाश्वत पद्धतीने उपयोग करूनच ही झेप घ्यावी लागेल. भारताच्या वाढत्या लोकसंख्येच्या आकड्यामागे एक आशादायक बाब म्हणजे त्यातील युवकांची सर्वाधिक संख्या असणार आहे. मात्र, या युवकांना सध्या शेतीतील क्लिष्ट आणि कामांमध्ये फारसे स्वारस्य दिसत नाही. या युवकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

Future Agriculture
Agriculture Technology : शेतीमाल मूल्यसाखळीला नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड

मुख्य आव्हाने :

कमी व खराब होणारी नैसर्गिक संसाधने : जमीन, पाणी, हवा, इंधन इत्यादी.

शेती निविष्ठांसाठी इतर देशांवरील अवलंबित्व : खते, रसायने, लागवड साहित्य, यंत्रसामग्री इत्यादी.

शेतीसाठी कमी होत जाणारे व इच्छा नसणारे मनुष्यबळ.

भारतीय उपखंडातील हवामानातील वैविधता आणि त्यात मोठ्या प्रमाणात जाणवत चाललेले हवामान बदल, हवामानातील अनियमितता इ.

बाजार, मागणी आणि पुरवठा यामधील अनिश्चितता.

या आव्हानांचा सामना करण्यासाठी शेती क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागेल. त्यासाठी शेतीत वापरण्यायोग्य व शेतकऱ्यांना वापरण्यास सुलभ असे नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये जैवतंत्रज्ञान (Biotechnology), आनुवांशिकी अभियांत्रिकी (Genetic Engineering), नॅनो तंत्रज्ञान (Nano Technology), ब्लॉकचेन तंत्रज्ञान (Block chain Technology), अक्षय ऊर्जा तंत्रज्ञान (Renewable Energy Technology), जैविक नियंत्रण तंत्रज्ञान (Biological Control Technology), डिजिटल तंत्रज्ञान ((Digital Technology) इत्यादीचा अंतर्भाव आहे.

(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर येथे संशोधन संचालक म्हणून कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com