Cotton Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Arrival: खानदेशात कापसाच्या आवकेत घट

Khandesh Cotton Market: देशात सध्या रोज तीन ते साडेतीन हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. ही आवक मागील हंगामाच्या तुलनेत कमी आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: देशात सध्या रोज तीन ते साडेतीन हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. ही आवक मागील हंगामाच्या तुलनेत कमी आहे. आवक कमी असल्याने दरात सुधारणा दिसत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

हंगामाच्या सुरुवातीला म्हणजेच ऑक्टोबरच्या मध्यात रोज सहा ते सात हजार गाठींच्या कापसाची आवक होत होती. आता आवक कमी आहे. यंदा कापूस लागवड घटली. रोगराई व अतिपावसाने उत्पादन कमी आले आहे. सध्या काही तालुक्यांतच कापसाची आवक आहे. अनेकांनी कापसाची विक्री फेब्रुवारी व मार्चच्या मध्यात केल्याने आता कापूस आवक कमी आहे. आवक कमी असल्याने दरात फारशी घट दिसत नसल्याचे चित्र आहे.

पुढील १० ते १५ दिवसांनंतर फक्त दीड ते दोन हजार क्विंटल कापसाची आवक होईल. कारण आता शेतकऱ्यांकडे कापूससाठा अल्प आहे. खानदेशसह अन्य भागांत अद्याप कापसाची आवक कमी असल्याने कापसाची खेडा खरेदी फारशी सुरू नाही. कापसाचे दर विविध भागांत वेगवेगळे आहेत.

खानदेशात सध्या दर्जेदार कापसाला प्रति क्विंटल ७१०० रुपये दर आहे. तर काही भागांत यापेक्षा कमी दर आहेत. कापूस आवक कमी असल्याने जिनिंग प्रेसिंग कारखान्यांतील कार्यवाहीदेखील फारशी गतीने सुरू नाही.

शेतकऱ्यांकडील साठा कमी

शेतकऱ्यांकडे कापूस फारसा नाही. यंदा कोरडवाहू कापसाचे उत्पादन एकरी ८० किलो ते एक क्विंटल एवढेच आले. अतिपावसात सर्वत्र कापसाची हानी झाली आहे. उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसत आहे. खानदेशात २० लाख गाठींचे उत्पादनही शक्य नाही, असेही सांगितले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT