Cotton Market : खानदेशात कापूस आवक होतेय कमी

Cotton Arrival : खानदेशात कापूस दरात सुधारणा फारशी झाली नाही. परंतु आता कापूस आवक कमी होत आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrwon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात कापूस दरात सुधारणा फारशी झाली नाही. परंतु आता कापूस आवक कमी होत आहे. खेडा खरेदीला प्रतिसाद कमी मिळत असून, शेतकऱ्यांकडील कापूससाठा ७० ते ७५ टक्के घटल्याची स्थिती आहे.

शासकीय कापूस खरेदीही बऱ्यापैकी झाली आहे. या केंद्रांत कापूस विक्रीसंबंधी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. पण खेडा खरेदीत दर उत्पादन कमी असून, यंदा कमीच आहे. कापसाचे उत्पादन अल्प आहे. कोरडवाहू कापूस एकरी ५० किलोच आला आहे. पूर्वहंगामी कापूस काही शेतकऱ्यांना तीन ते चार, तर काहींना दोन क्विंटल एवढाच हाती आला आहे.

Cotton Market
Union Budget 2025: कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! ५ वर्षांसाठी विशेष योजना जाहीर

परिणामी, कापसाचा साठाच शेतकऱ्यांकडे कमी आहे. यात खर्च मात्र वाढला आहे. खते, मशागत, मजुरी यावरील खर्च वाढला आहे. यामुळे कापसाला चांगला दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. पण दरवाढ मकर संक्रांतीनंतरही न झाल्याने अनेकांनी कापूस विक्रीची गती वाढविली. सध्या खानदेशात खेडा खरेदीत कापसाला ६२०० ते ६६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

Cotton Market
Cotton Procurement : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत साडेबारा लाख क्विंटल कापूस खरेदी

खानदेशात कापसाची बाजार समित्यांत आवक होत नाही. खेडा खरेदी किंवा थेट गावांत जावून खरेदी केली जाते. कापसाची आवक सध्या मागील पंधरवड्याच्या तुलनेत कमी झाली असून, प्रतिदिन २४ ते २५ हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. या महिन्याच्या मध्यात किंवा जानेवारीच्या सुरुवातीला प्रतिदिन सरासरी २९ ते ३० हजार क्विंटल कापसाची आवक होती.

हमीभाव नसल्याने आर्थिक नुकसान

आवकेत मागील काही दिवसांत काहीशी घट झाली आहे. परंतु हमीभाव नसल्याने व कापूस दरांत सुधारणा न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होतच आहे. अल्प शेतकऱ्यांनी सध्या कापसाची विक्री करणे टाळले आहे. कारण दरवाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना अजूनही आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com