Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : दहा तालुक्यांच्या पाणीपातळीत घट

Water Scarcity : तापमानाचा पारा वाढत चालल्याने भूजल पातळी झपाट्याने कमी होत चालली आहे. जिल्ह्याच्या दहा तालुक्यांत पाणीपातळीत मोठी घट झाल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण यंत्रणेने नोंदविले आहे.

Team Agrowon

Chandrapur News : तापमानाचा पारा वाढत चालल्याने भूजल पातळी झपाट्याने कमी होत चालली आहे. जिल्ह्याच्या दहा तालुक्यांत पाणीपातळीत मोठी घट झाल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण यंत्रणेने नोंदविले आहे. सध्या जिल्ह्याच्या पाण्याच्या पातळीत -०.२५ मीटरने घट झाली आहे.

जिल्ह्यात भूजल विकास यंत्रणेच्या १३४ निरीक्षण विहिरी आहे. वर्षभरातून चारदा या निरीक्षण विहिरीतील पाणी पातळीची नोंद घेतली जाते. त्यात प्रामुख्याने सप्टेंबर, जानेवारी, मार्च आणि मे महिन्यांचा समावेश आहे. निरीक्षण विहिरीतील पाणीपातळीची तपासणी केल्यानंतरच उन्हाळ्यात जिल्हा प्रशासन टंचाईचा आराखडा तयार करण्याचे काम करते.

या वर्षी मार्च महिन्यात १३४ निरीक्षण विहिरीतून पाण्याची पातळी तपासण्यात आली. त्यात जिल्ह्याच्या पाणीपातळीत -०.२५ मीटरने घट झाल्याचे दिसून येत आहे. सोबतच जिल्ह्यातील दहा तालुक्यांच्या पाणीपातळीत घट झाल्याचे या निरीक्षण भूजल सर्वेक्षण यंत्रणेने नोंदविले आहे.

पाणीपातळीत घट झालेल्या तालुक्यांत प्रामुख्याने बल्लारपूर, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, मूल, सावली, वरोरा, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड आणि जिवती तालुक्यांचा समावेश आहे. साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीशेवटी उन्हाचे चटके जाणवू लागतात. मार्च महिन्यापासून खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात होते.

एप्रिल आणि मे महिन्यातही वरुणराजाची जिल्ह्यावर कृपा राहिली. जिल्ह्याच्या अनेक भागांत गारपीट झाली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पारा कमी झाला आहे. पारा कमी झाला असला तरी पाण्याची समस्या सुटली नाही. जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीटंचाईने डोकेवर काढले आहे.

खासकरून जिवती तालुक्यात वाईट परिस्थिती आहे. पाण्यासाठी मोठी पायपीट या भागातील नागरिकांना करावी लागत आहे. जिवती तालुक्यात तेलंगणाने टँकर सुरू केले आहे. जिल्ह्यात मागीलवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT