Chana Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Sowing : हरभरा पेरणीच्या क्षेत्रात घट

Rabi Chana : पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जमिनीत फारसा ओलावा न राहिल्याने रब्बी हंगामात हरभरा पेरणीच्या क्षेत्रात घट झाली आहे.

Team Agrowon

Pune News : पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जमिनीत फारसा ओलावा न राहिल्याने रब्बी हंगामात हरभरा पेरणीच्या क्षेत्रात घट झाली आहे. आत्तापर्यंत पुणे विभागात सरासरीच्या एक लाख ८२ हजार ११९ हेक्टरपैकी एक लाख ३८ हजार ५७४ हेक्टर म्हणजेच ७६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पेरण्या झालेल्या ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत असून सरासरीच्या तुलनेत ४३ हजार ५४५ हेक्टरने पेरणीच्या क्षेत्रात घट झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

चांगले दर मिळत असल्याने मागील काही वर्षापासून हरभरा पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत. यंदा पाण्याची सुविधा असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी हरभरा पिकांची पेरणी केली. परंतु ज्या ठिकाणी ओल कमी आहे, अशा ठिकाणी कमी प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत.

विभागात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली असून सरासरीच्या १६ हजार ९५० हेक्टरपैकी १३ हजार ५५५ हेक्टर म्हणजेच ८० टक्के पेरणी झाली आहे. तर दक्षिण सोलापूर, करमाळा, उत्तर सोलापूर, माढा, मंगळवेढा या तालुक्यांत चांगली पेरणी झाली आहे. तर पंढरपूर, बार्शी, माळशिरस, मोहोळ, सांगोला या तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे.

नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात ७ हजार ९७४ हेक्टरपैकी सुमारे १० हजार ३ हेक्टर म्हणजेच १२५ टक्के पेरणी झाली आहे. तर पारनेर, कर्जत, जामखेड, शेवगाव, नेवासा, अकोले, श्रीरामपूर, राहाता तालुक्यांत ५० टक्क्यांहून अधिक तर संगमनेर, श्रीगोंदा, कोपरगाव या तालुक्यांत कमी पेरणी झाली आहे.

पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. जवळपास चार हजार ५८० हेक्टर म्हणजेच ४४ टक्के पेरणी झाली आहे. तर उर्वरित तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे. ज्या ठिकाणी पेरणी झाली आहे, तेथील पिके वाढीच्या अवस्थेत आहे.

जिल्हानिहाय झालेली हरभरा पिकांची पेरणी (हेक्टरमध्ये)

जिल्हा --- सरासरी क्षेत्र --- झालेली पेरणी -- टक्के

नगर --- ८८,३७७ -- ७५,३४३ -- ८५

पुणे -- ३४,३३० -- १९,८११ -- ५८

सोलापूर -- ५९,४१२ -- ४३,४२० -- ७३

एकूण -- १,८२,११९ -- १,३८,५७४ -- ७६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

Wetland Ecosystems: पाणथळ सृष्टी व्यवस्थेचे विश्व

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

SCROLL FOR NEXT