Chana Sowing : नांदेडमध्ये हरभरा पेरणीवर भर

Sowing Update : नांदेड जिल्ह्यात सध्या हरभरा, रब्बी ज्वारी, गहू, व करडीची पेरणी होत आहे. शेतकऱ्यांनी संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता चारापिकांच्या पेरणीत वाढ केली आहे.
Chana Sowing
Chana SowingAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड जिल्ह्यात सध्या हरभरा, रब्बी ज्वारी, गहू, व करडीची पेरणी होत आहे. शेतकऱ्यांनी संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता चारापिकांच्या पेरणीत वाढ केली आहे. जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी पावसाने खरिपासह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

खरिपात पावसामुळे झालेले नुकसान भरून निघावे यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रब्बी पिकाखालील क्षेत्र यावर्षी वाढविण्यासाठी बैठका घेऊन नियोजन केले होते. यानुसार जिल्ह्यात शेतकऱ्यांनी हरभरा, गहू, रब्बी ज्वारी पेरणीला महत्त्व दिले आहे.

Chana Sowing
Chana Crop Management : हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थापन

कृषी विभागाकडून हरभरा, करडी तसेच रब्बी ज्वारी पिकाचे अनुदानीत बियाणे वाटप केले आहे. प्रमाणित बियाणेही सवलतीच्या दरात उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात नांदेड, नायगाव, अर्धापूर, मुदखेड, उमरी, बिलोली, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, हिमायतनगर, किनवट, माहूर व धर्माबाद या तालुक्यांत रब्बी पेरणी आटोपली आहे.

Chana Sowing
Chana Crop in Crisis : मराठवाड्यातील हरभरा पीक धोक्यात

कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात दोन लाख ८४ हजार ३३८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात हरभरा दोन लाख ५८९३ हेक्टर, रब्बी ज्वारी २८ हजार ८१ हेक्टर, गहू ३० हजार ६५३ हेक्टर, रब्बी मका ९२७२ हेक्टर, तीळ ३४ हेक्टर, करडई ६८४१ हेक्टर,

रब्बी सूर्यफूल ५३ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती सांख्यिकी विभागाचे तंत्र अधिकारी प्रमोद गायके यांनी दिली. यंदा जिल्ह्यातील प्रकल्पात असलेला उपयुक्त पाणीसाठा तसेच मॉन्सूनोत्तर पावसामुळे जमिनीत असलेल्या कमी ओलाव्यामुळे चाऱ्याची उपलब्धता कमी होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com