Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : अतिवृष्टीने पिके वाया गेली, दुष्काळ जाहीर करा

Wet Drought : सततच्या पावसाने यंदाच्या खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने सोयाबीन या पिकाला मोठा तडाखा बसला.

Team Agrowon

Washim News : सततच्या पावसाने यंदाच्या खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने सोयाबीन या पिकाला मोठा तडाखा बसला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी ठिकठिकाणी निवेदने देत आहेत. मागणी करीत आहेत.

मानोरा तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे सर्वच नदी नाल्यांना पूर येऊन नदीकाठच्या शेतातील सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर, भाजीपाल्यासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे राज्य सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून मानोरा मंडलातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशा मागणी दिनेश मोरे यांनी तहसीलदारांकडे केली.

नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्यात यावे. तसेच राज्य सरकारने जाहीर केलेली शेती पंपाची वीजबिल माफी योजना ही अश्‍वशक्तीची कोणतीही अट न लावता सरसकट केली जावी.

ज्यांच्या घरांमध्ये पुराचे पाणी गेले त्या कुटुंबांना दहा हजार रुपये अनुदान द्यावे. शेतमजूर व छोटे शेतकऱ्यांकडील मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी दिनेश मोरे यांच्यासह सरपंच राहुल भगत, आनंद चव्हाण, सरपंच मेघाताई राजू चव्हाण (भुली), सोमनाथ नगर सरपंच शंकर राठोड, शेषराव राठोड आदिंनी केली आहे.

कारंजा तालुक्यात ओल्या दुष्काळाबाबत निवेदन

कारंजा तालुक्यासह पश्चिम विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतांचे तत्काळ पंचनामे करीत पिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी कारंजा तालुका पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख तथा तालुकाध्यक्ष विलास राऊत व इतरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तहसीलदारांमार्फत त्यांनी याबाबत निवेदन दिले. निवेदनात म्हटले, की सलग दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे व काही मंडलांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले.

त्याचा फटका पश्चिम विदर्भातील अमरावती महसूल विभागांतर्गत येणाऱ्या अमरावती, यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलडाणा या पाच ५ जिल्ह्यांतील लाखो हेक्टर शेतीला बसला. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे पिके खरडून गेली. शेतात पाणी साचल्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले. परिणामी, पिकांची वाढ खुंटली. पीक पिवळे पडले. संत्रा बागायतदारांचेही फळगळती होऊन नुकसान झाले. महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT