Maize Pesticide Spraying  Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Pesticide Spraying : मक्यावर कीटकनाशक वापरावेळी विषबाधेतून मृत्यू

Poisoning from Sprays : मका पिकात अमेरिकन लष्करी अळीला रोखण्यासाठी पोंग्यांमध्ये कार्बोफ्युरॉन १० टक्के हे कीटकनाशक वापरणारे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याची घटना मोताळा तालुक्यात घडली.

Team Agrowon

Buldhana News : मका पिकात अमेरिकन लष्करी अळीला रोखण्यासाठी पोंग्यांमध्ये कार्बोफ्युरॉन १० टक्के हे कीटकनाशक वापरणारे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याची घटना मोताळा तालुक्यात घडली. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून उर्वरित विषबाधितांवर उपचार सुरू आहेत.

मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे शिवारामध्ये मका पिकाची लागवड झालेली आहे. मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने त्यावर गुरुवारी (ता. १८) कीटकनाशक वापरताना शेतकरी दामोदर नारायण जाधव (वय ७०) यांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू ओढवला. तीन महिलांसह एक मुलगासुद्धा विषबाधा झाल्याने गंभीर झाला. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मक्याच्या पोंग्यात कार्बोफ्युरॉन १० टक्के हे दाणेदार कीटकनाशक वापरण्याचे काम जाधव यांच्या शेतात सुरू होते. मजुरांसह त्यांनीही हे काम केले. दुपारी आठ जणांना चक्कर येणे, मळमळीचा त्रास झाला. त्यामुळे सर्वांना तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र, दामोदर जाधव यांचा मृत्यू झाला.

शास्त्रज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक

कार्बोफ्युरॉन हे अत्यंत जुन्या पिढीचे कीटकनाशक असून त्याच्या ५० टक्के एसपी या फॉर्म्युलेशनची आयात, निर्मिती व वापरावर केंद्र सरकारकडून यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचे लेबल क्लेम तपासणे किंवा शिफारस केलेल्या कीटकनाशकांचाच वापर करणे गरजेचे आहे. तसेच कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT