Mark Plus Pesticide : ‘रॅलिस इंडिया’चे ‘मार्क प्लस’ तणनाशक बाजारात दाखल

Pesticide Launch : भारतीय कृषी निविष्ठा उद्योगातील अग्रेसर कंपनी रॅलिस इंडिया लि. तर्फे ‘मार्क प्लस’ हे नवीन तणनाशक महाराष्ट्र राज्यासाठी सादर केले आहे.
Mark Plus
Mark Plus Agrowon
Published on
Updated on

Rallis India Ltd : भारतीय कृषी निविष्ठा उद्योगातील अग्रेसर कंपनी रॅलिस इंडिया लि. तर्फे ‘मार्क प्लस’ हे नवीन तणनाशक महाराष्ट्र राज्यासाठी सादर केले आहे. सोयाबीन व भुईमूग या मुख्य पिकांतील प्रमुख व विविध तणांच्या प्रभावी व दीर्घकाळ तण नियंत्रणासाठी उपयुक्त ठरेल.

Mark Plus
Use of Pesticides : नियामक यंत्रणा सुधारण्याची संधी

सुरुवातीला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेले हे तणनाशक पुढे योग्य वेळी गुजरात, मध्य प्रदेश आणि अन्य प्रमुख बाजारपेठांमध्ये सादर करण्याचे नियोजन आहे.

Mark Plus
Disposal of Pesticides : मुदतबाह्य कीटकनाशकांच्या विल्हेवाटीचा अद्याप तिढा

या सादरीकरणाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना रॅलिस इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. नागराजन म्हणाले, की आम्ही विकसित केलेले मार्क प्लस हे एक शक्तिशाली व सुरक्षित तणनाशक आहे.

ते सोयाबीन आणि भुईमूग पिकांमध्ये वापरावयाचे उगवणपूर्व तणनाशक आहे. प्रगत संशोधनातून दोन सक्रिय घटकांचे वैशिष्ट्यपूर्ण फॉर्म्यूलेशन एकत्रित आणल्यामुळे मार्क प्लस हे तणांतील ALS या तण वाढीसाठी आवश्यक असलेल्या एन्झाइमला प्रतिबंधित करते आणि पेशी विभाजनासाठी महत्त्वपूर्ण मायक्रोट्यूब्यूल निर्मितीमध्ये अडथळा निर्माण करण्याची दुहेरी क्रिया करते. त्यामुळे विविध तणांचे प्रभावी व दीर्घकाळ नियंत्रण करत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com