Efficon Insecticide
Efficon InsecticideAgrowon

Efficon Pesticide : ‘बीएएसएफ’चे ‘इफिकॉन’ कीटकनाशक बाजारात दाखल

Insecticide : बीएएसएफ’ या जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीने स्वसंशोधित व अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘इफिकॉन’ हे नवे कीटकनाशक भारतीय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे.
Published on

Pune News : `बीएएसएफ’ या जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीने स्वसंशोधित व अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘इफिकॉन’ हे नवे कीटकनाशक भारतीय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. हैदराबाद येथे एका कार्यक्रमात नुकतेच त्याचे अनावरण झाले.

कंपनीच्या आशिया- पॅसिफिक विभागाच्या (ॲग्रिकल्चरल सोल्यूशन्स) वरिष्ठ उपाध्यक्ष सिमोने बर्ग, ‘ग्लोबल स्ट्रॅटेजिक मार्केटिंग’ विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. मार्को ग्रोझडॅनोव्हिक, व्यापार संचालक (ॲग्रिकल्चरल सोल्यूशन्स) गिरिधर राणुवा या वेळी उपस्थित होते.

Efficon Insecticide
Insecticide : उत्पादन, विक्री, वापरास प्रतिबंधित कीटकनाशकांचा साठा जप्त

या वेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना श्री. रेणुवा म्हणाले, की कापूस, भाजीपाला उत्पादनात भारत आघाडीवर आहे. मात्र रसशोषक किडींमुळे उत्पादकतेत ३५ ते ४० टक्के घट येते. ही समस्या ओळखूनच नव्या रसायनशास्त्रावर आधारित ‘इफिकॉन’ हे आंतरप्रवाही कीटकनाशक सादर केले आहे. ॲक्सालिऑन (डिमप्रॉपीरायडॅझ १२ एसएल) हा त्यातील मुख्य घटक आहे.

मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांचे नियंत्रण त्यांच्या वाढीच्या विविध अवस्थेत हे कीटकनाशक करते. कापूस, मिरची, टोमॅटो, वांगी, काकडी आदी पिकांत त्याची शिफारस आहे. किडींचे नियंत्रण करण्याची त्याची कार्यपद्धती (मोड ऑफ ॲक्शन) असलेला रासायनिक गट (आयरॅक गट क्र ३६) एकमेवाद्वितीय आहे. त्यामुळे प्रतिकार व्यवस्थापन प्रभावी होणार आहे. फवारणीनंतर दीर्घ परिणाम राहतो. ‘लेबल क्लेम’मुसार वापरल्यास मित्रकीटक व मधमाश्‍यांसाठी सुरक्षित आहे.

Efficon Insecticide
Liger Pesticide : ‘जीएसपी’चे कीटकनाशक ‘लायगर’ बाजारात

श्रीमती सिमोने व डॉ. मार्को म्हणाले, की जागतिक लोकसंख्या वाढत आहे. हवामान बदल, दुष्काळ, तापमान आदी संकटे आहेत. अशावेळी अन्नसुरक्षा निर्माण होण्याच्या दृष्टीने व जगभरातील शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून त्यांना शाश्‍वत उपाय देण्यासाठी ‘बीएएसएफ’ आपले संशोधन कौशल्य वापरून तंत्रज्ञान विकसित करीत आहे.

इफिकॉन त्याचाच भाग असून ऑस्ट्रेलिया, कोरियाच्या पाठोपाठ ते भारतीय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. विविध भागीदारी संस्थांसोबतही कंपनी कार्यरत असून, विविध गुणधर्माच्या पीकजाती, बियाणे, डिजिटल तंत्रज्ञान यातही संशोधन सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com