Mulberry Registration Agrowon
ॲग्रो विशेष

Mulberry Registration : तुतीच्या नोंदीसाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Farmer Extension Time of Mulberry Registration : शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी लागवडपूर्व नोंदणीसाठी ता. २० डिसेंबरपर्यंतची वेळ दिली होती. परंतु या रेशीम संचालनालयाकडून ता. ३० डिसेंबरपर्यंची मुदतवाढ दिली आहे.

Team Agrowon

Nanded News : शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी लागवडपूर्व नोंदणीसाठी ता. २० डिसेंबरपर्यंतची वेळ दिली होती. परंतु या रेशीम संचालनालयाकडून ता. ३० डिसेंबरपर्यंची मुदतवाढ दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सन २०२४ या वर्षासाठी तुती लागवडीसाठी रेशीम कार्यालयाकडे नोंदणी करावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी नृसिंह बावगे यांनी केले आहे.

जिल्हा रेशीम विकास कार्यालयामार्फत तुती लागवडीला चालना मिळावी, यासाठी महारेशीम अभियान राबविण्यात आले. यासाठी शेतकऱ्यांना २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ही नोंदणी जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालय, नांदेड,

संबंधित तालुक्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयात नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले होते. या काळात केवळ रेशीम विकास अधिकारी कार्यालयाकडे ७५० एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

सध्या नोंदणीसाठी रेशीम संचालनालयाने दहा दिवसांची मुदतवाढ दिल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी रेशीम कार्यालय, जिल्हा परिषद तसेच कृषी विभागाकडे संपर्क करण्याचे आवाहन रेशीम विकास अधिकारी नृसिंह बावगे यांनी केले आहे.

रेशीमकडे उद्दिष्टांपेक्षा दुप्पट नोंद

नांदेडला जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाला ३०० एकर, जिल्हा परिषदेला ४०० एकर तर कृषी विभागाला ३०० एकर असे एकूण १००० एकरचे लक्ष्यांक दिले होते. यात रेशीम कार्यालयाच्या कर्मचारी- अधिकाऱ्यांनी ७५० एकरांवर नोंदणी करून मराठवाड्यात चांगले काम केले आहे. तर जिल्हा परिषद तसेच कृषी विभागाकडे मात्र नोंदणी झाल्याची माहिती नसल्याचे रेशीम संचालनालयाने कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT