Mulberry Cultivation : तुती लागवडीसाठी ६९० एकरांवर नोंदणी

Silk Farming : मराठवाड्यातील महारेशीम अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेल्या नोंदणी अंतर्गत आतापर्यंत ६६५ शेतकऱ्यांनी ६९० एकरांवर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे.
Mulberry Cultivation
Mulberry Cultivation Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील महारेशीम अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेल्या नोंदणी अंतर्गत आतापर्यंत ६६५ शेतकऱ्यांनी ६९० एकरांवर तुती लागवडीसाठी नोंदणी केली आहे.

रेशीम विभागाला महारेशीम अभियानाच्या माध्यमातून ३३५० एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. येत्या २० डिसेंबरपर्यंत रेशीम उद्योगात सहभागासाठीची नोंदणी केली जाणार आहे.

महारेशीम अभियानाच्या माध्यमातून नोंदणीची तारीख लक्षात घेता जवळपास बारा दिवसच आता नोंदणीसाठी उरले आहेत. रेशीम संचालकांच्या आवाहनानुसार दिलेल्या उद्दिष्टाच्या दुप्पट नोंदणी होणे अपेक्षित आहे.

मराठवाड्यातील रेशीम विभागाला मिळालेल्या उद्दिष्टानुसार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर या जिल्ह्यांना प्रत्येकी ३५० एकरांवर नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Mulberry Cultivation
Mulberry Cultivation : मराठवाड्यात २ हजार एकरांवर तुती लागवडीचे लक्ष्य

दुसरीकडे हिंगोली जिल्ह्याला २५० एकर, नांदेड जिल्ह्याला ३०० एकर, धाराशिवला ६५० एकर, तर बीड जिल्ह्याला ७५० एकरवर नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ६६५ शेतकऱ्यांनी ६९० एकर वरच आतापर्यंत संपूर्ण मराठवाड्यात रेशीम उद्योगासाठी रेशीम विभागाच्या माध्यमातून नोंदणी केली आहे.

कृषी विभाग, जिल्हा परिषदेला लक्ष्यांक...

यंदाच्या महारेशीम अभियानात जिल्हा परिषद आणि कृषी विभाग यांनाही उद्दिष्ट देण्यात आले आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात कृषी विभागाला ३६०० एकर तर जिल्हा परिषदेला ३३०० एकरचे उद्दिष्ट देण्यात आले.

Mulberry Cultivation
Mulberry Plantation : परभणी, हिंगोलीत १८५० एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट

या दोन्ही विभागाने आतापर्यंत महारेशीम अभियानाच्या माध्यमातून किती लक्ष्यांक गाठला याची माहिती अजून समोर आली नाही. राज्यातील कृषी विभागाला ८९०० एकर तर जिल्हा परिषदेला ८०६५ एकरवर तुती लागवडीचा लक्ष्यांक देण्यात आला आहे अर्थात दिलेल्या लक्ष्यांकाच्या तुलनेत दुप्पट नोंदणीची अपेक्षा रेशीम विभागाच्या संचालकांनी व्यक्त केली आहे.

जिल्हानिहाय ५ डिसेंबर पर्यंतची नोंदणी (रेशीम विभाग)

जिल्हा शेतकरी संख्या एकर

छत्रपती संभाजीनगर १९८ २२०

जालना १०४ १०४

परभणी १०८ १०३

हिंगोली ५५ ५५

नांदेड २८ २८

लातूर ४५ ४५

धाराशिव १९ १९

बीड १०८ ११६

महारेशीम अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. या पुढील काळात मोठ्या प्रमाणात शेतकरी नोंदणी करतील अशी अपेक्षा आहे.
- बी. डी. डेंगळे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com