Crop Damage Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : नोव्हेंबरमधील नुकसानग्रस्तांना मिळणार वाढीव भरपाई

Agriculture Compensation Update : पीक नुकसान झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने भरपाईसाठी पाच कोटी ५१ लाखांची मागणी केली आहे. ही भरपाई जिरायती, बागायती व फळपिकधारकांना वाढीव स्वरूपात मिळणार असल्याची माहिती सूत्राने दिली.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी तीन दिवसांत मान्सून्नोत्तर पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे तीन हजार ७५८ शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता. यामुळे कापूस, तूर, ज्वारी, हरभरा व फळबागांचे नुकसान झाले होते.

यात नायगाव, अर्धापूर, मुखेड व भोकरमध्ये सर्वाधिक पीक नुकसान झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने भरपाईसाठी पाच कोटी ५१ लाखांची मागणी केली आहे. ही भरपाई जिरायती, बागायती व फळपिकधारकांना वाढीव स्वरूपात मिळणार असल्याची माहिती सूत्राने दिली.

नांदेड जिल्ह्यांच्या यंदा जुलै व ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा नोव्हेंबर महिन्यातील २७, २८ व २९ तारखे दरम्यान एकूण १५ मंडळात अतिवृष्टी झाली. अर्धापूरमध्ये केळी, पपईच्या बागा आडव्या झाल्या आहेत. तुरीच्या फुलाची गळ झाली.

वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या. वीज पडून पाच जनावरे दगावली. दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यंत्रणेला दिले होते. त्यानुसार हे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात नायगाव, अर्धापूर, मुखेड व भोकर या चार तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

या भागातील तीन हजार ७५८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. गारपिटीने जिरायती, बागायत व फळपिकांचे असे एकूण तीन हजार ७५८ हेक्टरवरील नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने अपेक्षित पाच कोटी ५१ लाख इतक्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी सांगितले.

तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वाढीव भरपाई मिळणार

जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये झालेल्या नुकसानीबाबत शासनाने शेतकऱ्यांना वाढीव मदतनीधीसह तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे जिरायती पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६००, बागायती पिकासाठी २७ हजार तर फळपिकासाठी ३६ हजार रुपये मिळणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Leaf Blight: भातावरील करप्याचे कारण ओळखूनच उपाय करा

Crop Damage: पाऊस पडला तरी पिकांचे नुकसान भरून येणार नाही

Crop Loan Burden : कर्जाआधीच शेतकऱ्यांच्या खिशाला झटका!

Automated Weather Stations: आजऱ्यात हवामान केंद्रांसाठी ६५ ग्रामपंचायतींची सहमती

Maize Threshing: बागायती मका पीक मळणीवर

SCROLL FOR NEXT