Crops Compensation : वाढीव नुकसान भरपाईसह वाळू डेपोंचा मार्ग मोकळा?

compensation for damages : नोव्हेंबर २०२३ मधील अवेळी पाऊस, गारपीट यांसह नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीला लवकरच निकषाबाहेर वाढीव भरपाई मिळणार आहे. याबाबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत.
Crops Compensation
Crops Compensation Agrowon

Nagpur News : राज्यात अवकाळी, गारपिटीमुळे नोव्हेंबर २०२३ शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्याप्रमाणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी पंचनाम्यांची माहिती तीन दिवसात पाठवावी असे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले आहेत. त्यांनी हे निर्देश नागपूर येथे झालेल्या विविध विषयांवर आढावा बैठकीत दिले. तसेच यावेळी बिदरी यांनी वाळू डेपोही सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

राज्यात २६ ते २८ नोव्हेंबर २०२३ दरम्यान अवकाळी आणि गारपीट झाली होती. ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होचे. त्यावेळी अशा शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याची घोषणा झाली होती. त्यानंतर पंचनामे आणि अहवाल शासनास मिळाले होते.

Crops Compensation
Mango Season : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा उत्पादक संकटात

पुन्हा माहिती द्यावी लागणार

त्यानुसार यानुसार १ जानेवारी २०२४ रोजी शासन निर्णय काढण्यात आला. त्यावेळी नागपूर विभागात ५५१५७.४३ हेक्टर क्षेत्र वाधित झाले होते. त्यासाठी ७४६४.८५१ लक्ष निधीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. पण आता नव्या शासन निर्णयानुसार पुन्हा माहिती द्यावी लागणार आहे. त्याप्रमाणे पुढील तीन दिवसात ती माहिती जिल्ह्यांनी द्यावी असे निर्देश बिदरी यांनी दिले आहेत.

विभागाला ८२५ कोटींचे उद्दिष्ट

यावेळी बिदरी यांनी, जमीन महसूल वसुलीबाबत सुचना करताना, विभागाला दिलेले ८२५ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करा. त्यासाठी महसूल विभागातील यंत्रणांनी जोमाने कामाला लागा असेही त्यांनी म्हटलं आहे. तर याबाबत जिल्हाधिकारी ते तलाठीपर्यंत गोपनिय अहवाल मागवला जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

Crops Compensation
Mango Season : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा उत्पादक संकटात

वाळू डेपो

गेल्या वर्षी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील वाळू धोरणाची घोषणा केली होती. त्याप्रमाणे विभागातील सर्व जिल्ह्यामध्ये वाळू डेपो सुरू करण्यास पर्यावरण विभागाची मंजूरी मिळणार आहे. त्यामुळे २६ जानेवारी पासून वाळू डेपो कार्यान्वित करावे असेही त्यांनी म्हटलं आहे.

सौर कृषी वाहिनी

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत विभागात एकूण २७७ उपकेंद्र उभारण्यात येणार आहेत. यापैकी १८६ उपकेंद्रासाठी शासकीय जमीन देण्यात आली आहे. तर ४८ उपकेंद्राना अंशत: जमीन उपलब्ध झाली आहे. तसेच शिल्लक ४३ उपकेंद्राना खाजगी मालकीची जमीन उपलब्ध करून देण्याच्या सुचना यावेळी बिदरी यांनी दिल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com