Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : पाचोड परिसरात वादळी वाऱ्यामुळे आंबे, मोसंबी, डाळिंबाचे नुकसान

Crop Damage : पाचोड (ता. पैठण) सह परिसरात गेल्या आठ वादळी वाऱ्याने थैमान घातले असून दररोजच्या ढगाळ वातावरणाने चादर पांघरली. मंगळवारी (ता. २३) दुपारी चार वाजेच्या सुमारास पाचोड (ता. पैठण) सह परिसरात जोरदार वादळी वाऱ्याने वीस मिनिटे हजेरी लावली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : पाचोड (ता. पैठण) सह परिसरात गेल्या आठ वादळी वाऱ्याने थैमान घातले असून दररोजच्या ढगाळ वातावरणाने चादर पांघरली. मंगळवारी (ता. २३) दुपारी चार वाजेच्या सुमारास पाचोड (ता. पैठण) सह परिसरात जोरदार वादळी वाऱ्याने वीस मिनिटे हजेरी लावली. मोसंबीसह डाळिंब, पपई, केळी व आंब्याचे प्रचंड नुकसान झाले. एवढेच नव्हे तर सोंगलेल्या रब्बीसह उन्हाळी बाजरी ज्वारी, हरभऱ्याचे कडप वादळी वाऱ्याने रानात अस्ताव्यस्त विखुरले गेले.

खरिपाची वाट लागल्यानंतर शेतकऱ्यांची मदार रब्बीसह फळबागावर अवलंबून होती, मात्र मंगळवारी (ता.२३) अचानक वातावरणात बदल होऊन पाचोडसह मुरमा, बोडखा, थेरगाव, लिंबगाव, हर्षी, वडजी, दादेगाव, खादगाव, रांजणगाव दांडगा, आडगाव, एकतुनी, नांदर आदी ठिकाणी वादळी वाऱ्याने जोमदार हजेरी लावल्याने सोंगणी केलेले ज्वारीचे पाचुंदे, हरभऱ्याचे कडप बाजरीच्या सुड्या रानोमाळ विखुरल्या गेल्या तर आंब्याला लगडलेल्या कैऱ्या, डाळिंब व मोसंबीच्या आंब्या व हस्त बहराच्या फळांचा झाडाखाली सडा पडला.

घड लगडलेल्या तोंडाशी आलेल्या केळीचे झाडे, दीड महिन्यापूर्वी लावलेल्या पपईचे झाडे अर्ध्यातून तुटून पडून शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले. काही ठिकाणी कच्चे पत्र्याचे घर उडून गेले. एकंदर वादळी वाऱ्यामुळे काही कळण्यापूर्वीच सर्व दाणादाण उडाली.

ऐन केळीच्या परिपक्वतेच्या वेळीच केळीचे पीक जमीनदोस्त होऊन आडवी झाली. मोसंबी व डाळिंबाच्या बागांत वाऱ्यामुळे फळांचा सडा पडून मोठे नुकसान झाले, तर पपई व केळीच्या बागांचे वाऱ्यामुळे मोठे नुकसान होऊन झाडे व केळी लगडलेले घड तुटून पडले. रब्बी, उन्हाळी पिकांसह मोसंबी, केळी, डाळिंब व आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याचे चिन्हे स्पष्ट दिसत आहे.

यावेळी पाचोड खुर्दचे सरपंच नितीन वाघ, रांजनगावचे अफसर पटेल, वडजीचे सरपंच भाऊसाहेब गोजरे, बाबूतात्या गोजरे, कट्ठू पटेल, मुरम्याचे बंडू चिडे, दिनकर मापारी, थेरगावचे बद्री निर्मळ, दत्ता निर्मळ, पंडितआण्णा जावळे, खादगावचे महेश डाके, हर्षीचे डॉ. गणेश राऊत, कृष्णा आगळे, सुभाष निर्मळ आदींनी मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy procurement : देशात ११ महिन्यांत धान खरेदी ४ टक्के अधिक, अतिरिक्त साठा विकण्याची सरकारची तयारी

Turmeric Farming: हळदीची पाने पिवळी पडण्यामागील कारणे, उपाय

Free Flour Mill Scheme: मोफत पीठ गिरणी योजना; महिलांसाठी संधी, आजच अर्ज करा!

Sugarcane Farming: उसासाठी संतुलित अन्नद्रव्यांचा वापर

PM Kisan 21st Installment : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळू शकते खुशखबर?; पीएम किसानच्या २१ व्या हप्त्यापूर्वी तुमचे स्टेटस तपासा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

SCROLL FOR NEXT