Pune News: ऊसतोडणी मजुरांना बिबट्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी साखर आयुक्तालयाने सुचविलेल्या उपाययोजना कागदावरच राहिल्या आहेत. तोडणीची कामे असुरक्षित स्थितीत करावी लागत असल्याचे मजूर संघटनांचे म्हणणे आहे. .साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी १० ऑक्टोबर २०२५ रोजी काढलेल्या आदेशान्वये काही उपाययोजना सुचविल्या होत्या. सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक तसेच खासगी साखर कारखान्यांच्या महाव्यवस्थापकांना पाठवलेल्या या आदेशाची क्षेत्रिय पातळीवर क्वचितच अंमलबजावणी झाली आहे..Leopard Conflict: ...तर बिबट निर्बिजीकरण अडकेल ‘लाल फिती’त!.राज्यात यंदा जास्त ऊस असल्यामुळे सर्व कारखाने गाळप नियोजनात प्रचंड व्यग्र आहेत. दुसऱ्या बाजूला कारखान्यांची संचालक मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीत आहेत. या गोंधळात ऊस क्षेत्रातील बिबट्यांचे हल्ले वाढल्याने ऊसतोडणी मजूर भेदरलेले आहेत..मजूर संघटनांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक कारखान्याने मजुरांच्या तात्पुरत्या वस्त्यांभोवती कुंपण उभारायची गरज होती. या वस्त्यांमध्ये पुरेशा प्रकाशासाठी दिवे तसेच शौचालये पुरवायला हवी होती. बहुतेक कारखान्यांनी मजुरांना नेहमीप्रमाणे वाऱ्यावर सोडले आहे. ‘‘मजूर वस्त्यांभोवती स्वच्छता, पुरेसा प्रकाश नसल्यास तसेच पाळीव प्राणी फिरत असल्यास बिबटे आकर्षित होऊ शकतात..Leopard Terror: बिबटे पकडले, पण दहशत कायम!.साखर आयुक्तालय केवळ आदेश काढू शकते. त्यापलीकडे आमच्या हातात काहीही नाही. ऊसतोडणी मजुरांच्या प्रत्येक झोपडीची काळजी घेण्याची मुख्य जबाबदारी संबंधित साखर कारखान्यांचीच आहे,’’ असे साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले..साखर आयुक्तांनी सुचविलेल्या उपाययोजनाबिबट्याबाबत नेमकी काय काळजी घ्यावी याचे वन विभागामार्फत मजुरांना मार्गदर्शनशेतीऐवजी इतर सुरक्षित जागी मजुरांची व्यवस्थामजूर वस्त्यांना कुंपण, दिवे आणि शौचालये पुरवावीत..वन्य श्वापदांपासून तोडणी कामगारांना संरक्षण मिळण्यासाठी त्यांच्या तात्पुरते वस्त्यांना कुंपण, दिवे व शौचालये पुरवली जात आहेत.चंद्रकांत ढगे, कार्यकारी संचालक, भीमाशंकर साखर कारखाना, दत्तात्रयनगर, ता. आंबेगाव, जि. पुणे.साखर आयुक्तालयाने दिलेले आदेश ऊसतोडणी मजुरांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. मात्र, दुर्दैवाने आदेश कागदावरच आहेत. बिबटप्रवण क्षेत्रातील साखर कारखान्यांचे मजूर जीव मुठीत धरून काम करीत आहेत.गहिनीनाथ थोरे पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतूक, मुकादम, कामगार यूनियन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.