Pune News: पुणे जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांमधील ११ विद्यार्थ्यांची ‘रोबोटिक्स इंटरनॅशनल २०२५’ या रोबोटिक्स आणि तंत्रज्ञान स्पर्धेसाठी निवड झाली आहे. .ही स्पर्धा ५ आणि ६ डिसेंबरला युरोपमधील एस्टोनिया देशातील टाल्लीनमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे पाच विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होतील..Vatsagulma Agri Competition: वत्सगुल्म स्मार्ट पेरणी स्पर्धेत ३२ हजार शेतकरी सहभागी.निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंजवडी, लोणीकंद तसेच महापालिकेच्या खराडीमधील राजाराम भीकू पाथरे शाळा, भवानी पेठेतील बी. टी. शहाणी नवहिंद हायस्कूल.Crop Competition : खरीप पीक स्पर्धेत सहभागी व्हा; कृषी विभागाचे आवाहन.डॉ. सायरस एस. पूनावाला इंग्रजी माध्यम हायस्कूल आणि गुरूनानक शाळेतील विद्यार्थी सहभागी होतील. निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण हे पहिल्यांदाच परदेश प्रवास करीत आहेत..दृष्टिहीन व्यक्तींना चालण्यासाठी अडचणी येतात. त्यासाठी आम्ही दोघांनी प्रकल्प तयार केला आहे. ज्यामध्ये दृष्टिहीन व्यक्तींसाठी छोटा कॅमेरा आणि हेडफोन मार्गदर्शक ठरू शकतो. चालताना कॅमेरा समोर दिसतो अन् हेडफोनद्वारे त्या व्यक्तीला सूचना करतो. यामुळे दृष्टिहीन व्यक्तीही समाजात आत्मविश्वासाने वावरू शकते. कुठलाही अडथळा न येता ते सहज मार्गक्रमण करू शकतात.आरोही उजगरे, सौरभ पडदूने, विद्यार्थी, जि. प. प्राथमिक शाळा, लोणीकंद.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.