Crop Damage : जळकोट तालुक्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे आंब्यांचे मोठे नुकसान

Unseasonal Rain : जळकोट तालुक्यातील विविध भागात मंगळवारी (ता.नऊ) सायंकाळी अवकाळी पावसासह वादळवाऱ्याने झोडपून काढले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Jalkot News : जळकोट तालुक्यातील विविध भागात मंगळवारी (ता.नऊ) सायंकाळी अवकाळी पावसासह वादळवाऱ्याने झोडपून काढले. यात वाऱ्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतात चांगली वाढ झालेल्या कैऱ्यांचा झाडाखाली सडा पडला होता. काही दिवसांत तोडणी होणाऱ्या कैऱ्या उकिरड्यावर टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

हवामान विभागाने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केल्यानुसार मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शहरासह तालुक्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला.त्यामुळे रब्बी पिकांसह आंब्याच्या बागाचे अतोनात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आंब्याची एका क्षणात वादळी वाऱ्याने राखरांगोळी केली. झाडावरील अनेक कैऱ्या झडल्या. झाडाखाली कैऱ्यांचा सडा पडला होता.

Crop Damage
Unseasonal Rain : सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा धुमाकूळ

जळकोट येथील शेतकरी बालाजी माधव बनसोडे यांनी आपल्या शेतीमध्ये पाण्याचा कुठलाही स्रोत नाही. तरिही त्यांनी डोक्यावर पाणी आणून आंब्याची झाडे तळहाताच्या फोडाप्रमाणे जगवली.

Crop Damage
Crop Damage : पावसाने जळगावात मोठी हानी

यंदा आंब्याला मोठ्या प्रमाणावर मोहर लागला होता. झाडाला समाधानकारक कैऱ्या लगडल्या होत्या. यंदा आंब्याचे चांगले उत्पादन मिळण्याची त्यांना आशा होती. मात्र सायंकाळी अचानक वादळवाऱ्याने रौद्ररूप धारण केले. शेतातील झाडाखाली कैऱ्यांचा सडा पडला. त्यांच्या अथक परिश्रमावर पाणी फेरले गेले.

भाजीपाला, टरबुजालाही फटका

वादळी वाऱ्यासह पावसाने शिवारातील काढणीला आलेल्या ज्वारीचे नुकसान झाले. शिवाय टरबूज, केळी, आंबा फळांबरोबरच भाजीपाल्यालाही फटका बसला आहे. प्रशासनाने बांधावर येऊन पाहणी करावी, तसेच नकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com