Chilli Market Agrowon
ॲग्रो विशेष

Karnataka Red Chillies: डहाणूकरांची पहिली पसंती; कर्नाटकच्या लाल मिरचीला जोरदार मागणी!

Red Chilli Market: कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील व्यापारी ट्रकभर मिरची घेऊन दाखल झाले आहेत. स्थानिक मिरचीपेक्षा तुलनेने स्वस्त आणि चांगल्या प्रतीची असल्याने १५० ते १८० रुपये प्रति किलो दराने ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत.

Team Agrowon

Mumbai News: उन्हाळा सुरू होताच घरगुती मसाले तयार करण्यासाठी डहाणू तालुक्यात मिरची खरेदीला वेग येतो. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथून आलेले व्यापारी ट्रकभर मिरची घेऊन विक्रीसाठी दाखल झाले आहेत. सध्या या मिरचीला १५० ते १८० रुपये प्रति किलो दर मिळत असून, मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत.

तालुक्यात मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबे अजूनही पारंपरिक पद्धतीने घरगुती मसाले तयार करण्याला प्राधान्य देतात.आम्ही कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर मिरची आणत आहोत आणि येथील नागरिक ती अगदी आवडीने घेतात.

आमच्या भागात मिरचीचे मोठे उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांकडून ती खरेदी करून विक्री करीत आहोत. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही मिरची विक्री करण्यासाठी या भागामध्ये येत असल्याचे विक्रेती नीलिता पूर्गम यांनी सांगितले.

पावसाळ्यासाठी चार महिन्यांचा मसाला तयार करावा लागतो. गेल्या वर्षी येथेच मिरची खरेदी करून मसाला तयार केला होता आणि तो चांगला टिकला. त्यामुळे यंदाही मी पाच किलो मिरची घेतली असल्याचे दिलीप मोरघा यांनी सांगितले.

तुलनेने स्वस्त

डहाणू तालुक्यात स्थानिक मिरचीचे दर २२५ ते २५० रुपये प्रति किलोपर्यंत आहेत. त्यामुळे तुलनेने स्वस्त आणि चांगल्या प्रतिच्या कर्नाटकातील मिरचीला मागणी वाढली आहे. बाजारात बेडगी, काश्मिरी, पांडी आणि लवंगी या प्रकारच्या मिरच्यांची विक्री होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT