Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Dairy Business : पशुपालन व दुग्ध व्यवसायातून शेतीतील उत्पन्नाची जोखीम कमी करणे शक्य आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागप्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे यांनी केले.
Cow Conservation
Cow ConservationAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास अनन्यसाधारण महत्त्व आहे.पशुपालन व दुग्ध व्यवसायातून शेतीतील उत्पन्नाची जोखीम कमी करणे शक्य आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागप्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संकरित गो पैदास प्रकल्प येथे मंगळवारी (ता. २२) शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा करण्यात आला. या वेळी डॉ. लोंढे बोलत होते. कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनात आयोजित या कार्यक्रमात प्रारंभी गो पूजन करण्यात आले.

Cow Conservation
Desi Cow Conservation : व्यावसायिक देशी गोवंश जतन, संवर्धन गरजेचे

या वेळी पशुविज्ञान शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. देशमुख, सहयोगी प्राध्यापक डॉ. डी. व्ही. बैनवाड, डॉ. पी. व्ही. पडघन, डॉ. नरेंद्र कांबळे, जी. पी. भोसले, सृष्टी भिंगारडे, रवी काळे, महेंद्र कचरे, माणिक शिंदे आदी उपस्थित होते.

Cow Conservation
Desi Cow : शेती, आरोग्यासाठी देशी गोवंश संवर्धनावर लक्ष द्या

देशी गोवंशाचे संवर्धन व देशी गाईच्या संकरीकरणातून दुग्धोत्पादनात वाढ करणे या उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात परभणी येथे १९७५ मध्ये संकरित गो पैदास प्रकल्प स्थापन करण्यात आला.

मराठवाड्यातील देवणी प्रजाती दुग्धोत्पादन व शेतीकाम अशी दुहेरी उपयोगाची आहे.याप्रकल्पाच्या ठिकाणी सध्या देवणी व होल्स्टिन फ्रिजियन (होलदेव) प्रजातीचे १७० पशुधन आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com