Anil Olambe Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Sanvad : हळदीच्या कीड, रोगास प्रतिकारकक्षम वाणांची लागवड करावी : ओळंबे

Anil Olambe : कीड, रोगास प्रतिकारकक्षम सुधारित वाणांची लागवड करावी. अधिक उत्पादकतेसाठी शुद्ध बेण्याची लागवड करावी.

Team Agrowon

Hingoli News : हळदीला चांगले बाजारभाव मिळण्यासाठी लागवडपूर्व तसेच काढणीपश्‍चात बाबींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा. कीड, रोगास प्रतिकारकक्षम सुधारित वाणांची लागवड करावी. अधिक उत्पादकतेसाठी शुद्ध बेण्याची लागवड करावी, असे प्रतिपादन तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विशेषज्ञ (उद्यानविद्या) अनिल ओळंबे यांनी केले.

‘सकाळ-ॲग्रोवन’ व‌ रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रा. लि. यांच्या तर्फे शुक्रवारी (ता. २४) सकाळी कुरुंदा (ता. वसमत) येथील दुर्गामाता मंदिर सभागृहात हळद लागवड व व्यवस्थापन या विषयावर ‘ॲग्रोवन संवाद’ चर्चासत्रात ते बोलत होते. तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे अध्यक्षस्थानी होते. रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रा. लि. वरिष्ठ कृषी सल्लागार शिवराज लोणाळे, विभागीय व्यवस्थापक‌ विजय घुगे,

वसमतच्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील तंत्र अधिकारी रमेश देशमुख, ‘सकाळ’चे सहायक व्यवस्थापक (वितरण) अनंता रेनगडे, सकाळचे हिंगोली जिल्हा वितरण प्रतिनिधी संतोष जवळे, कुरुंदा येथील बातमीदार प्रकाश इंगोले, रिवुलिस इरिगेशन इं. प्रा. लि.चे अधिकृत विक्रेते शिवचंद्र भुस्से, प्रगतिशील शेतकरी सदाशिव गवळी, युवराज दळवी, शंकरराव इंगोले, विश्‍वनाथ दळवी, मंगेश दळवी, पी. के. माने, एस. एन. गुडलोड, वितरण प्रतिनिधी सुरेश पाचकोर उपस्थित होते.

ओळंबे म्हणाले, की मे महिन्याचा अखेरचा आठवडा ते १५ जून या कालावधीत हळद लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते. क्षारयुक्त जमिनीत हळद लागवड टाळावी. कंद माशीचा प्राद्रर्भाव लवकर ओळखून उपाययोजना केल्यास नुकसान कमी करणे शक्य आहे. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य, कीड, रोग, पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा.

लोणाळे म्हणाले, की काटेकोर पाणी व्यवस्थापनावरच हळदीची उत्पादकता अवलंबून आहे. देशमुख म्हणाले, की निर्यातीसाठी आवश्यक रेसीड्यू फ्री हळद उत्पादनासाठी हळद संशोधन केंद्रातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. सेलम वाणास तोडीस तोड असलेल्या बेणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. भिसे म्हणाले, की हळद उत्पादक शेतकऱ्यांनी गावातच हळद प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास रोजगार निर्मिती होईल. प्रक्रिया उद्योगासाठी अनुदानाची सुविधा आहे. अॅग्रोवनचे जिल्हा बातमीदार माणिक रासवे यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT