Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : पावसाने ओढ दिल्याने पिके कोमजली

Crop Damage : येत्या आठडाभर पाऊस पडला नाही तर हलक्या प्रतीच्या जमिनीवरील पिकांना चांगलाच फटका बसण्याची चिन्हे आहेत.

Team Agrowon

Dharashiv News : खरीपातील पिके ऐन फुल व फळ धारणेत असतानाच पावसाने दडी मारल्याने सध्या पिके कोमजली आहेत. येत्या आठडाभर पाऊस पडला नाही तर हलक्या प्रतीच्या जमिनीवरील पिकांना चांगलाच फटका बसण्याची चिन्हे आहेत.

या स्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यातून पिकांना सावरण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून पिकांना तुषार व अन्य पर्यायातून पाणी दिले जात आहेत. मात्र, शेतकऱ्यांचे हे प्रयत्न अपुरे पडत असून पिकांच्या निकोप वाढीसाठी आता पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.

जिल्ह्यात पावसाने पंधरा ते वीस दिवसापासून दडी मारली आहे. यातच अचानक उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन पडले असून वातावरणात उकाडा वाढला आहे. यामुळे जमिनीतील ओल संपून पिकांचे फुल व फळ गळती सुरू झाली आहे. दररोज काही वेळाच्या अंतराने ढगाळ वातावरण तयार होत होत आहे.

आकाशात काळे ढग जमून काही वेळातच पाऊस पडण्याची शक्यता असतानाच पाऊस पडत नाही. रात्रीच्या वेळी वीजा व ढगांचा गडगडाट सुरू असतो. मात्र, काही थेंब पडून पाऊस गायब होत आहे. पावसाचा पाठशिवणीचा खेळ दिवसभर असतो. यातच काही भागात पाऊस पडत असून काही भागात अजून पावसाने हजेरी लावलेली नाही.

यामुळे काही भागात पिके कोमजली असून त्याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. यावर्षी कधी नव्हे ती वेळेवर पाऊस पडल्यामुळे खरीपातील पिके दमदार होती. मात्र, पावसाने ओढ दिल्यामुळे पिके हातची जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे.

या स्थितीत सिंचनाच्या सुविधा असलेले शेतकरी तुषार, रेनगन, रेणबो व अन्य सिंचनाद्वारे पिकांना पाणी देऊन त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. पिकांचे जास्त क्षेत्र व उपलब्ध आठ तासाच्या वीजेमुळे शेतकऱ्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून पावसाची प्रतीक्षा सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT