Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : राज्यात ६८ हजार हेक्टर पिके नष्ट; पंचनामे सुरू

Crop Survey : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ६८ हजार हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. पाऊस थांबल्यामुळे पीक पंचनाम्याची कामे वेगाने सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ६८ हजार हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. पाऊस थांबल्यामुळे पीक पंचनाम्याची कामे वेगाने सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

अतिपावसाचा सर्वाधिक तडाखा विदर्भाला बसला आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी, भंडारा, साकोली व लाखांदूर तालुक्यांतील १७ हजार ६७६ हेक्टरवरील पिकांची अतिपावसाने हानी झाली आहे. यात मुख्यत्वे भात, सोयाबीन, तूर, कापूस व भाजीपाला पिकाचा समावेश आहे. पावसामुळे दुसरे सर्वांत मोठे नुकसान चंद्रपूरमधील भात, कापूस, तूर, सोयाबीन व भाजीपाला पिकाचे झाले आहे. ही पिके चंद्रपूर, मूल, सावली, नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, गोंडपिंपरी व पोंभुर्णा तालुक्यांतील आहेत.

तेथील नुकसानग्रस्त क्षेत्र ११ हजार २२९ हेक्टरच्या पुढे आहे. अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर व पातूर भागातील अंदाजे सव्वातीन हजार हेक्टरवरील कापूस, सोयाबीन व तुरीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवळा, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील चार हजार ८४५ हेक्टरवरील; नागपूरसह कामठी, हिंगणा, सावनेर, रामटेक, मौदा, उमरखेड, भिवापूर व कुहीमधील सहा हजार ७६३ हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. गडचिरोली जिल्ह्यात देखील आठ हजार २७७ हेक्टरवरील खरीप पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे.

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे खरीप व फळपिकांचे २५ जुलैच्या सायंकाळपर्यंत हाती आलेले नुकसानग्रस्त अंदाजे क्षेत्र असे (सर्व आकडे हेक्टरमध्ये) : सिंधुदुर्ग जिल्हा १४४४, रायगड २०९, अहमदनगर ८२, जळगाव २०८, धुळे ३८३, बुलडाणा १११६३, अमरावती ८०३, अकोला ३१४२, वाशीम ७०५, यवतमाळ ९५२, नागपूर ६७६३, वर्धा ४८४५, चंद्रपूर ११२२९, गोंदिया ४८२, भंडारा १७६७६ व गडचिरोली जिल्हा ८२७७.

साडेचारशे हेक्टर शेतजमीन वाहून गेली

अतिपावसामुळे अमरावती जिल्ह्यातील ४३० हेक्टर भागातील; तर अकोला जिल्ह्यातील ३४ हेक्टर शेतजमीन वाहून गेली. कोकण व घाटमाथ्यावरील शेतीचे देखील नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण होताच निश्चित नुकसान समजू शकेल, असे महसूल विभागाचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT