Sugarcane Intercropping Management: आंतरपीक पद्धती ही ऊस शेतीसाठी वरदान आहे. उसामध्ये द्विदलवर्गीय आंतर पिकामुळे आर्थिक फायदा होतो, त्याचबरोबर मुबलक प्रमाणात नत्राचे स्थिरीकरण होते. यामुळे ऊस पिकाची नत्राची गरज कमी करता येते. रासायनिक खतांचा खर्च कमी होतो. पीक पद्धतीनुसार आंतर पिकांची निवड करावी.