Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Post Monsoon Crop Damage : विदर्भात मॉन्सूनोत्तर पावसाचा पिकांना फटका

Crop Damage Due To Heavy Rain : नागपुर जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर पावसाला सुरुवात झाली. पूर्व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात रविवारी रात्रीनंतर बरसलेल्या पावसामुळे कपाशी, तूर या पिकाला बसला आहे.

Team Agrowon

Nagpur News : मॉन्सूनोत्तर पावसाने पूर्व विदर्भाला झोडपून काढले असून सर्वाधिक पावसाची नोंद वाशीम जिल्ह्यात ६६ मिमि, तर बुलडाणा जिल्ह्यात ६१ मिमि झाली. त्यापाठोपाठ अकोला येथे ४१.८, यवतमाळ २९, अमरावती २३.४ मिमि याप्रमाणे पावसाची नोंद हवामान खात्याने घेतली आहे. अवकाळी पावसाचा फटका तूर, कपाशी या पिकांना बसला असून सर्वेक्षणाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

विदर्भासह राज्यात रविवारनंतर (ता.२६) गारपीट आणि वादळीवाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. त्यानुसार रविवारी (ता.२६) सायंकाळी तर काही जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर पावसाला सुरुवात झाली. पूर्व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात रविवारी रात्रीनंतर बरसलेल्या पावसामुळे कपाशी, तूर या पिकाला बसला आहे. पांढरकवडा तालुक्‍यातील खैरगाव देशमुखचे प्रकाश पुप्पलवार यांचे तुरीचे पीक बहरावर होते.

फुलधारणा झाल्याने बंपर उत्पादकतेची त्यांना अपेक्षा होती. परंतू अवकाळी पावसाने क्षणातच होत्याचे नव्हते झाले, अशी खंत त्यांनी व्यक्‍त केली. पाऊस, वाऱ्यामुळे तूरीचा फुलोरा गळून पडला. काही भागात तूरीचे पीक आडवे झाले. परिणामी आता काहीच हाताला लागणार नाही, अशी भिती शेतकऱ्यांमध्ये आहे.

खरिपात ९ लाख हेक्‍टरपैकी पाच लाख हेक्‍टरवर कपाशी राहते. कपाशीच्या रानात पाणी साचल्याने पानावरील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. कपाशीची दोन वेचणीतच उलंगवाडी होणार आहे. आधीच उत्पादकता कमी झाली असताना नुकसान सोसावे लागणार आहे.

सध्याचे वातावरण पाहता धुके पडण्याची दाट शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी तूर पिकासाठी संध्याकाळी व पहाटे शेकोटी पेटवून धूर सोडावा. पोटॅशियम नायट्रेट (१३ः०ः४५) ची फवारणी करावी. यामुळे वातावरणातील बदलाच्या ताणाला सहन पीक सहन करू शकण्यास समर्थ ठरते. या काळात हरभरा व तूर पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. त्याकरीता बुरशीनाशकाची फवारणी करावी.
- डॉ. प्रमोद यादगीरवार, सह्योगी संशोधन संचालक, विभागीय संशोधन केंद्र, मध्य विदर्भ, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: गाळप हंगामासाठी नांदेड विभागातील २९ साखर कारखान्यांचे अर्ज

Agrowon Diwali Article: सर्वांगीण उन्नती साधणारी राजपुतांची शेतीसंस्कृती

Sindhudurg Rain: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी

Agrowon Diwali Article: शेतीसोबत आयुष्याचा ताळेबंदही फायद्यात राहिला पाहिजे...

Pond Management: राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन साताऱ्याकडे?

SCROLL FOR NEXT