Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : नांदेडला ४१७ कोटींच्या पीक नुकसान वाटपाची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण

Heavy Rain Crop Loss : नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर २०२४ या महिन्यात अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या सात लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने ८१२ कोटी ३८ लाख रक्कम मंजूर केली आहे.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर २०२४ या महिन्यात अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या सात लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने ८१२ कोटी ३८ लाख रक्कम मंजूर केली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ८३ हजार २९७ शेतकऱ्यांना ४१७ कोटी ५२ लाख रकमेचे वाटप करण्यासाठीची माहिती ऑनलाइन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे. उर्वरित चार लाख शेतकऱ्यांची माहिती दोन दिवसात भरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यामध्ये एक ते तीन सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली होती. यात खरिपातील जिरायती, बागायती व बहुवार्षिक पिकांसह शेतजमिनीचे पाच लाख ९६ हजार ५१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हा फटका जिल्ह्यातील सात लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांना बसला होता.

यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी ८१२ कोटी ३८ लाख साठ हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडे केली होती. या मागणीनुसार शासनाने नांदेडला ८१२ कोटींचा निधी मंजूर केला. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ८३ हजार २९७ शेतकऱ्यांना ४१७ कोटी ५२ लाख रकमेचे वाटप करण्यासाठीची माहिती ऑनलाइन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे.

उर्वरित चार लाख शेतकऱ्यांची माहिती दोन दिवसांत भरण्यात येणार आहे. माहिती भरण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे संदर्भ क्रमांक संबंधित गावाच्या तलाठ्यांना देण्यात आले आहेत. या संदर्भ क्रमांकाद्वारे सेतू सुविधा, आपले सरकार केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदतीची रक्कम जमा होणार आहे.

उर्वरित चार लाख शेतकऱ्यांची माहिती पुढील दोन दिवसांत भरण्यात येणार आहे. त्यामुळे सप्टेंबर २०२४ या महिन्यात अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या तलाठ्याकडे जाऊन आपला संदर्भ क्रमांक घ्यावा व ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, जेणे करून त्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.

तालुकानिहाय प्राप्त निधी

नांदेड २९.८५ कोटी

अर्धापूर ३२.९७ कोटी

कंधार ७१.२७ कोटी

लोहा ८४.४० कोटी

बिलोली ५६.६४ कोटी

देगलूर ५०.९५ कोटी

मुखेड ५५.९२ कोटी

नायगाव ५६.६४ कोटी

धर्माबाद २७.२६ कोटी

उमरी ३२.७० कोटी

भोकर ५२.१९ कोटी

मुदखेड २९.३५ कोटी

हदगाव ८२.२७ कोटी

हिमायतनगर ४४.६१ कोटी

किनवट ८०.४२ कोटी

माहूर ३५.१२ कोटी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT