Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : सीबिल स्कोअर न पाहता शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावे

MP Rajabhau Waje : थकित कर्जदारांची कारणे जाणून घेऊन त्यांच्यासह शेतकऱ्यांचा सीबिल स्कोअर न पाहता त्यांनाही पीककर्ज वितरणाच्या सूचना खासदार राजाभाऊ वाजे यांनी केल्या.

Team Agrowon

Nashik News : नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या व्यक्तींनाच पीककर्ज देण्याचा राष्ट्रीयीकृत बँकांचा कल राहिला आहे. परंतु थकित कर्जदारांची कारणे जाणून घेऊन त्यांच्यासह शेतकऱ्यांचा सीबिल स्कोअर न पाहता त्यांनाही पीककर्ज वितरणाच्या सूचना खासदार राजाभाऊ वाजे यांनी केल्या.

खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मंगळवारी (ता. ९) जिल्हाधिकारी कार्यालयात बँकांची तिमाही आढावा बैठक घेतली. या वेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक सी. बी. सिंग, व्यवस्थापक भिवा लवाटे, ‘नाबार्ड’चे अमोल लोहकरे, गणेश सरोदे यांसह बँक अधिकारी व विविध महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.

आर्थिक विकास महामंडळांच्या विविध योजना, बँकांमार्फत होणाऱ्या कर्ज वितरणाचा आढावा घेण्यात आला. या वेळी खासदार वाजे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. ते म्हणाले, ‘‘पीककर्ज देताना बँका नियमित कर्जदारांना प्राधान्य देतात. त्यांना कर्ज मिळालेच पाहिजे. परंतु काही कारणास्तव शेतकरी थकित कर्जदार झाले आहेत. शेतकऱ्यांचा सीबिल स्कोअर न बघता त्यांनाही पीककर्ज दिले पाहिजे.’’

महिला बचत गटांना अर्थसाह्य करताना जाचक अटी लावू नका. पुढील तीन महिन्यांनी होणाऱ्या बैठकीत दिलेल्या सूचनांचा पुन्हा आढावा घेण्यात येईल. ज्या बँका व्यवस्थितपणे काम करणार नाहीत, त्यांची वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करण्याचा इशाराही खासदारांनी दिला. जिल्हाधिकारी शर्मा यांनीही बँक अधिकाऱ्यांना नियमितपणे तालुकास्तरीय बैठकांना उपस्थित राहण्याची सूचना केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT