Agriculture Crop Loan : उद्दिष्ट तेराशे कोटींचे, वाटप साडेचारशे कोटींचे

Crop Loan Disbursement : खरीपाच्या पेरण्या उरकत आल्या तरी जिल्ह्यात केवळ ३३.९९ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे.
Kharip Crop Loan
Kharip Crop Loan Agrowon
Published on
Updated on

Jalna News : गतवर्षी पडलेल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असताना आता राष्ट्रीयकृत बॅंकांकडून पीककर्ज वाटपात खोडा घातला जात आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या उरकत आल्या तरी जिल्ह्यात केवळ ३३.९९ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाचे या बॅंकांवर नियंत्रण नसल्याने ही विदारक स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज वाटपाचे १३०८ कोटींचे उद्दिष्टे आहे. मात्र, पेरण्या उरकत आल्या असताना ही आतापर्यंत केवळ ४४६ कोटींचे ६२ लाखांचे पीककर्ज वाटप झाले आहे. यामध्ये जिल्हा बॅंकने ४३ हजार ९७९ शेतकऱ्यांना ११६ कोटी ६१ लाख आठ हजार तर महाराष्ट्र ग्रामिण बॅंकेने १७ हजार २७९ शेतकऱ्यांना १६६ कोटी ४२ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे.

Kharip Crop Loan
Crop Loan : मराठवाड्यात जूनअखेर ४६ टक्केच कर्जपुरवठा

या दोन बॅंका वगळता इतर एकाही राष्ट्रीयकृत, व्यापारी बॅंकेने ३० टक्के देखील पीककर्ज वाटप केलेले नाही. त्यामुळे पीककर्ज वाटपाचा आकडा वाढत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे  जिल्हा प्रशासनही या राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांच्या पीककर्ज वाटपासंदर्भात ठोस भूमिका घेताना दिसून येत नाहीत.

Kharip Crop Loan
Crop Loan : शेतकऱ्यांना ९६ टक्के पीककर्जाचे वितरण

परिणामी शेतकरी पीककर्जापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. खरीप पेरणीसाठी पीककर्जाशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नाही. अशात बॅकांकडून पीककर्ज वाटपात हात आखडता ठेवला जात असल्याने आतापर्यंत ७२ हजार ६४५ शेतकऱ्यांना ४४६ कोटी ६२ लाखा सात हजारांचे  पीककर्ज मिळाले आहेत. तर हजारो शेतकरी पीककर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

यंदा १३०८ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टे आहे. त्यानुसार पीककर्ज वाटप सुरू असून आतापर्यंत ७२ हजार ६४५ शेतकऱ्यांना ४४६ कोटी ६२ लाखा सात हजारांचे  पीककर्ज बॅंकांकडून वाटप झाले आहे. आजपर्यंत ३३.९९ टक्के पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टे पूर्ण झाले आहे.
प्रेषित मोघे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, जालना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com