Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Crop Loan Update : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी आर्थिक अडचणी येऊ नये, म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) रब्बीसाठी एकूण ६८५ कोटी ७३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Team Agrowon

Pune News : यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने रब्बीत ज्वारी, हरभरा पिकांचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी आर्थिक अडचणी येऊ नये, म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) रब्बीसाठी एकूण ६८५ कोटी ७३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कर्ज वाटपाची प्रकिया सुरू करण्यात आली असून आत्तापर्यंत २०६ कोटी ८६ लाख रुपयांचे वाटप झाले असल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षी बँकेने रब्बीसाठी एकूण ६३० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले होते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पीक कर्जात जवळपास ५५ कोटींनी वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी फारशा अडचणी येणार नसल्याचे बँकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीक कर्जाचा आधार घेऊन रब्बीचे नियोजन करून पिके घेतात.

यंदा पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या जवळपास ३०० शाखांमार्फत गावपातळीवरील सुमारे १३०६ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना देतात. सध्या बँकेकडून तीन लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने, तर तीन लाखांहून अधिक पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप करत आहेत.

रब्बी पिकांव्यतिरिक्त ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भुईमूग अशा अनेक पिकांना पीक कर्जाचे वाटप करणार आहे. त्यामुळे दरवर्षी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, शिरूर, पुरंदर या तालुक्यात पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. रब्बी हंगामात विविध पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीक कर्जाचा आधार घेऊन खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामाचे नियोजन करून पिके घेतात.

तालुकानिहाय रब्बी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

तालुका उद्दिष्ट

आंबेगाव ७१ कोटी रुपये

बारामती ४६ कोटी ३ लाख रुपये

भोर २३ कोटी रुपये

दौंड ५५ कोटी १० लाख

हवेली १० कोटी ५० लाख

इंदापूर १६० कोटी ५० लाख

जुन्नर ८२ कोटी ३० लाख

खेड ६६ कोटी रुपये

मावळ १६ कोटी ५० लाख

मुळशी १९ कोटी ५० लाख

पुरंदर ४२ कोटी १० लाख

शिरूर ८५ कोटी २० लाख

वेल्हा ८ कोटी रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Spice Industry : चटणी, मसाला उद्योगातून समृद्धी

Agriculture Development : कृषी क्षेत्रामध्ये झांबियाची वाढतेय गुंतवणूक

Weekly Weather : ईशान्य मॉन्सून महाराष्ट्राबाहेर मार्गस्थ

Global Development Trust : ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकूलचे उद्घाटन

Agriculture University Promotion : कृषी विद्यापीठातील पदोन्नतीचे आदेश न काढणे कायदेशीर : आनंदकर

SCROLL FOR NEXT