Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : अकोला जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची गती संथ

Kharif Season 2025 : जून महिना सुरू झाला असला तरीसुद्धा अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही पीककर्जाचा पुरेसा लाभ मिळालेला नाही.

Team Agrowon

Akola News : जून महिना सुरू झाला असला तरीसुद्धा अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही पीककर्जाचा पुरेसा लाभ मिळालेला नाही. खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यातील पीककर्ज वाटपाची गती अत्यंत संथ असून, ३१ मे अखेर हे वाटप ५० टक्क्यांच्याही खाली आहे. परिणामी, खरिपाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम महत्त्वाचा असतो. शेतकरी मिळालेल्या पीककर्जाचा बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी वापर करतात. मात्र, अद्याप बहुतांश शेतकऱ्यांना कर्ज मंजूर झालेले नाही. शासनाने प्रत्येक वर्षी यासाठी वेळेत प्रक्रिया करून कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिलेले असतात.

गेल्या महिन्यात पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत पीककर्ज वाटपाचे निर्देश देत वाटपाला गती देण्याचे सांगितले होते. तरीही बँकांची टाळाटाळ, कागदपत्रांची पूर्तता आणि कर्जमाफीच्या अपेक्षांमुळे यंदा पीककर्ज वाटप प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे बोलले जाते. अकोला जिल्ह्यात सुमारे ५४ हजार ५८३ शेतकऱ्यांना आतापर्यंत ६१५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. ३१ मे अखेर लक्षांकाच्या तुलनेत हे वाटप ४६.६० टक्के इतके आहे.

या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात एक लाख ३६ हजार ६५० शेतकऱ्यांना १३२० कोटी रुपये वाटपाचे लक्ष निर्धारित करण्यात आलेले आहे. आजवर झालेल्या पीककर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ४३३ कोटी रुपयांचे वितरण केले. या बँकेला ६३६ कोटी रुपये वाटपाचा लक्षांक देण्यात आलेला आहे.

आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच ६८ टक्के उद्दिष्ट पूर्ती या बँकेची झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ४७६ कोटी रुपये वाटपाचे लक्ष दिलेले असून त्यातुलनेत १२० कोटी रुपये वाटप झाले आहेत. २५ टक्केच लक्षांक गाठलेला आहे. खासगी क्षेत्रातील बँकांनी ४७ कोटीच्या तुलनेत ११ कोटी रुपये वाटप झाले. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने १६० कोटींच्या तुलनेत ४९ कोटी ५० लाखांचे वाटप केले.

या बँकेचा वाटप ३० टक्के एवढाच झालेला आहे. बहुतांश बँकांनी अद्याप अर्ज प्रक्रियेचे कामच पूर्ण केलेले नाही. काही बँकांनी जुन्या थकीत कर्जाची कारणे सांगून नव्या कर्ज वाटपास टाळाटाळ सुरु केली आहे. दुसरीकडे खरिपाच्या कामाला सुरुवात झाली आहे. यंदा बी-बियाण्याचे दर वाढले आहेत. कर्ज न मिळाल्यास कसे भागवावे अशी अडचण आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Urea Shortage : युरिया टंचाईवर ग्रीन अमोनियाची मात्रा?

Manikrao Kokate Controversy : बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना

MSP Committee : हमीभाव समितीच्या तीन वर्षांत सहा बैठका

Atal Pension Yojana : आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून?

Maharashtra ITI upgrade : राज्यातील शंभर ‘आयटीआय’चे बळकटीकरण करणार

SCROLL FOR NEXT