Crop Loan : शेतकऱ्यांना मध्यवर्ती, ग्रामीण बँकेचाच आधार

Kharif Season 2025 : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. अशास्थितीत शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती तसेच ग्रामीण बँकेनेच आधार दिला आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. अशास्थितीत शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती तसेच ग्रामीण बँकेनेच आधार दिला आहे. आतापर्यंत वाटप झालेल्या पीक कर्जात जिल्हा बँकेने ४७.६७ तर ग्रामीण बँकेने ४०.१३ टक्के टार्गेट पूर्ण केले आहे. राष्ट्रीयकृत २० तर खासगी बँका अकरा टक्केवरच आहेत.

पीक कर्ज वाटपासाठी प्रशासनाकडून बँकांना दोन हजार दोनशे कोटी रुपये टार्गेट दिले आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पीककर्ज मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा खरीप हंगामात पेरणी करण्याच्या तयारीला लागलेले आहेत. मात्र, वेळेवर पीक कर्ज मिळेल की नाही, ही चिंता त्यांना सतावत आहे.

Crop Loan
Amaravati Crop Loan : पीककर्ज वाटपावर जिल्हाधिकाऱ्यांना नियंत्रणाचे आदेश

यंदाच्या हंगामातदेखील बँकांनी अडवणुकीचे धोरण अवलंबिले असून, कासवगतीने पीककर्ज वाटप होत आहे. २६ मे पर्यंत केवळ २९.६४ टक्के पीककर्ज वाटप झालेले आहे. त्यातही राष्ट्रीयीकृत बँकांचा ‘परफॉमन्स’ नेहमीप्रमाणे संथ असाच आहे. वेळेवर धावपळ होऊ नये, म्हणून शेतकरी पीक कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवत आहेत.

मात्र, त्यांना विविध कारणे दाखवून परत पाठविले जात आहे. राष्ट्रीयीकृत बँकांत सर्वाधिक त्रुटी काढल्या जात असल्याची ओरड आहे. ज्या बँकेत शेतकऱ्यांचे खाते आहे. त्यांना वेळेत पीक कर्ज देण्याचे निर्देश आहेत.

Crop Loan
Kharif Crop Loan : खरीप पीककर्ज वाटप उद्दिष्टात ११० कोटी ६३ लाख रुपये वाढ

प्रत्यक्षात कर्जासाठी आलेल्या शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. निसर्गाचा लहरीपणा, दुबार पेरणी, नापिकी, सावकारी कर्ज, फवारणीचा फास, फसवी ठरलेली कर्जमाफी, शासनाच्या मदतीची पोकळ घोषणा, यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यात कोणताच हंगाम शेतकऱ्याला साथ देताना दिसत नाही.

घाम गाळून पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही. लागवडीचा खर्च निघत नसल्याने शेती व्यवसाय तोट्याचा ठरत आहे. निराशेच्या गर्तेत सापडलेला शेतकरी यंदातरी उत्पन्न होईल, या एकमेव आशेने खरिपात राबराब राबण्याची तयारी ठेवतो. मात्र, बँकांकडून मिळणारा प्रतिसाद थंड आहे. बँकांनी पीक कर्जाचे वाटप तातडीने करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com