Kharif Crop Loan : खरीप पीककर्ज वाटप उद्दिष्टात ११० कोटी ६३ लाख रुपये वाढ

Kharif Season 2025 : यंदाच्या (२०२५) खरिप हंगामात परभणी जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी, सहकारी, ग्रामीण मिळून २० बँकांना मिळून एकूण १ हजार ५८१ कोटी ६० लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : यंदाच्या (२०२५) खरिप हंगामात परभणी जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी, सहकारी, ग्रामीण मिळून २० बँकांना मिळून एकूण १ हजार ५८१ कोटी ६० लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

गतवर्षीच्या (२०२४) खरिप हंगामातील १ हजार ४७० कोटी ९७ लाख रुपये उद्दिष्टांच्या तुलनेत यंदा ११० कोटी ६३ लाख रुपये वाढ करण्यात आली. दरम्यान, यंदाच्या हंगामात शनिवार (ता. १७) पर्यंत विविध बँकांनी मिळून ६ हजार ६५३ शेतकऱ्यांना ८१ कोटी ७१ लाख ८८ हजार रुपये (५.१७ टक्के) पीककर्ज वाटप केले होते.

यंदाच्या खरिपात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना (राष्टयीकृत ) एकूण १ हजार १६२ कोटी २७ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ३३९ कोटी १३ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ३१२ कोटी ९ लाख रुपये, खाजगी बँकांना ११७ कोटी २ लाख रुपये उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Crop Loan
Kharif Crop Loan : पीक कर्ज वितरण वेगाने करा

गतवर्षीच्या ९४७ कोटी ८८ लाख रुपयाच्या तुलनेत यंदा राष्ट्रीयकृत बँकांच्या उद्दिष्टात २१४ कोटी ३९ लाख रुपये वाढ करण्यात आली. गतवर्षीच्या १७२ कोटी ९४ लाख रुपयाच्या तुलनेत यंदा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उद्दिष्टात १३९ कोटी १५ लाख रुपये वाढ करण्यात आली. गतवर्षीच्या २२७ कोटी ३९ लाख रुपयाच्या तुलनेत यंदा महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या उद्दिष्टात १११ कोटी ७४ लाख रुपये वाढ करण्यात आली.

Crop Loan
Amaravati Crop Loan : पीककर्ज वाटपावर जिल्हाधिकाऱ्यांना नियंत्रणाचे आदेश

गतवर्षीच्या १२२ कोटी ७६ लाख रुपयाच्या तुलनेत यंदा खाजगी बँकांचे उद्दिष्ट ५ कोटी ७४ लाख रुपयांनी कमी करण्यात आले. शनिवार (ता. १७) अखेर व्यापारी बँकांनी २ हजार २०५ शेतकऱ्यांना ३० कोटी २६ लाख रुपये (३.२५ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ४ हजार ३७१ शेतकऱ्यांना ५१ कोटी ८ लाख रुपये (१५.०६ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ७७ शेतकऱ्यांना ३७ लाख ८८ हजार (०.१२ टक्के) पीककर्ज वाटप केले.

चालू वर्षी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टात ७ कोटींची वाढ...

परभणी जिल्ह्यातील बँकांना चालू आर्थिक (२०२५-२६) वर्षात २ लाख ३५ हजार ९५८ शेतकऱ्यांना एकूण २ हजार २६० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात खरिपात १ लाख ६४ हजार २६ शेतकऱ्यांना १ हजार ५८१ कोटी ६० लाख रुपये तर रब्बी मध्ये ७१ हजार ९३२ शेतकऱ्यांना ६७८ कोटी ४० लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.

२०२४-२५ च्या तुलनेत यंदा खरिप पिककर्जाच्या उद्दिष्टात ११० कोटी ६३ लाख रुपये वाढ करण्यात आली. परंतु रब्बी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट १३३ कोटी ६३ लाख रुपयांनी कमी करण्यात आले. त्यामुळे एकूण पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टात केवळ ७ कोटीची वाढ झाल्याचे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com