Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के अग्रिम रक्कम

Crop Insurance Advance : जिल्ह्यातील सर्व ९३ महसूल मंडलातील पिकांच्या उत्पादनामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे जिल्हास्तरीय समितीने निरीक्षण नोंदविले आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यातील सर्व ९३ महसूल मंडलातील पिकांच्या उत्पादनामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे जिल्हास्तरीय समितीने निरीक्षण नोंदविले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी असलेल्या नियमानुसार पीकविमा कंपन्यांनी २५ टक्के अग्रिम तातडीने द्यावा, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यांनी लागू केली आहे. यामुळे सोयाबीन, कापूस, ज्वारी व तूर या पिकांसाठी विमा भरलेल्या शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपातील जिरायती, बागायती व फळपिकांचे पाच लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या होत्या.

या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच विमा कंपनीकडेही नुकसानीबाबत पूर्वसूचना दाखल करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, शेतीपिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नुकसान भरपाईबाबत अधिसूचना लागू करून विमाधारक शेतकऱ्यांना लगेच भरपाई देण्याचे अधिकार आहेत. यानुसार

जिल्हाधिकारी अभिजित राऊत अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीने नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना २०२४-२५ अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अर्थात मिड सेशन डव्हर्सिटी अशी अधिसूचना लागू केली आहे.

त्यामुळे समितीच्या सर्व्हेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित आहे. त्यामुळे समितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना लागू केली आहे.

कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये

सद्यःस्थितीत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकांअंतर्गत २५ टक्के अग्रिम रक्कम पीक विमाधारकांना मिळणार आहे. उर्वरित रक्कम स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत पंचनामे झाल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणानुसार मिळेल.

तसेच पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीनुसार संबोधित मंडळात उत्पादन घटले असेल तर उत्पादन आधारित नुकसान भरपाई घटकानुसार भरपाई मिळेल, याची नोंद घ्यावी. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT