Indian Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Maharashtra: पीकविम्याची भरपाई नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी मंजूर

Maharashtra Government Support: खरिप २०२४ मध्ये झालेल्या नुकसानासाठी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई जाहीर झाली असून कोल्हापूर जिल्ह्याला सर्वाधिक मदत मिळणार आहे.

Anil Jadhao 

Pune News: खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासाठी पीकविम्याची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई मिळणार आहे. तर नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी भरपाई मिळणार आहे. पीकविम्याची भरपाई काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यालाही सुरुवात झाली. 

राज्यात खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसान भरपाईपोटी २२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २ हजार ३०८ कोटी रुपये वाटप करण्यात येणार आहेत. यात मराठवाड्यातील जिल्ह्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई मिळणार आहे. मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांना १ हजार ७६० कोटी विमा भरपाई मिळणार आहे. तर विदर्भातील ९ जिल्ह्यांना ४८९ कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. या तुलनेत मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना कमी भरपाई मिळणार आहे. 

पुणे

स्थानिक नैसर्गिक आपत्ती - २ कोटी ८९ लाख

सोलापूर

पीक कापणी प्रयोग - ९५ लाख

सांगली

स्थानिक नैसर्गिक आपत्ती - २ कोटी ७८ लाख

पीक कापणी प्रयोग - ६ लाख

एकूण भरपाई - २ कोटी ८५ लाख

कोल्हापूर

स्थानिक नैसर्गिक आपत्ती - ७ कोटी ५९ लाख

काढणी पश्चात भरपाई - १ कोटी १२ लाख

एकूण भरपाई - ८ कोटी ७१ लाख

सातारा

पीक कापणी प्रयोग - ४ कोटी १० लाख

नाशिक

पीक कापणी प्रयोग - ३ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT