
Pune News: जिल्ह्यानिहाय पीकविमा भरपाईचा विचार करता परभणी जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरपाई मंजुर झाली आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण ४२६ कोटी विमा भरपाई मंजूर आहे. तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी एकूण १ हजार ७६० कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे. काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होण्याला सुरुवात झाली. तर उरलेल्या शेतकऱ्यांना पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये भरपाई मिळेल, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात पीकविम्याची भरपाई मंजूर झाली आहे. मग कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर झाली ? तसेच कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर आहे? याची माहिती पुढीलप्रमाणे
छत्रपती संभाजीनगर
स्थानिक नैसर्गिक आपत्ती - ८३ कोटी ३८ लाख
पीक कापणी प्रयोग भरपाई - ४कोटी ८३ लाख
एकूण भरपाई - ८८ कोटी २१ लाख
जालना
स्थानिक नैसर्गिक आपत्ती - १९६ कोटी ९५ लाख
काढणी पश्चात भरपाई - ६६ कोटी ४४ लाख
एकूण भरपाई - २६३ कोटी ४० लाख
परभणी
स्थानिक नैसर्गिक आपत्ती - १०१ कोटी ८९ लाख
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती - २९६ कोटी ८८ लाख
काढणी पश्चात भरपाई - २७ कोटी ७७ लाख
एकूण भरपाई - ४२६ कोटी ५५ लाख
नांदेड
स्थानिक नैसर्गिक आपत्ती - १०२ कोटी ६२ लाख
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती - २४५ कोटी ५९ लाख
एकूण भरपाई - ३५७ कोटी २१ लाख
हिंगोली
स्थानिक नैसर्गिक आपत्ती - २६ कोटी ६८ लाख
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती - १५४ कोटी ३६ लाख
एकूण भरपाई - १८१ कोटी ५ लाख
बीड
स्थानिक नैसर्गिक आपत्ती - २१२ कोटी ७६ लाख
धाराशिव
स्थानिक नैसर्गिक आपत्ती - २३१ कोटी ५ लाख
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.