Crop Diseases agrowon
ॲग्रो विशेष

Crop Diseases : पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव; उन्हाचाही तडाखा

Reduced Rainfall : भुईमुगाच्या सऱ्या पूर्णपणे भरल्यानंतरच हुमणींची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. उसावर मोठ्या प्रमाणात तांबेरा रोग दिसत आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Weather Update : जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर अचानक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस बंद झाला. यानंतर पावसाने जोरदार उन्हाचा तडाखा बसत असल्याने तसा धरणांमधील पाणीसाठाही कमी होत आहे.

राधानगरी धरणात ९५ टक्के, तुळशी, वारणा, दूधगंगा, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा धरणात सरासरी ८० ते ९० टक्के पाणीसाठा आहे, तर पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे भुईमुगाला हुमणी आणि उसाला तांबेरा रोगांचा प्रार्दुभाव दिसून येत आहे.

पावसाचे प्रमाण कमी झाल्यापासून उन्हाचे चटके जाणवत आहेत. दोन दिवसांपासून जिल्ह्यातील ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, अजूनही पोटरीला आलेल्या भात पिकासाठी जोरदार पावसाची गरज आहे. माळरानातील भुईमूग आणि उसाला हुमणी लागली आहे.

भुईमुगाच्या सऱ्या पूर्णपणे भरल्यानंतरच हुमणींची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. उसावर मोठ्या प्रमाणात तांबेरा रोग दिसत आहे. शेतकऱ्यांना उसाच्या पानांवर टॉनिक आणि इतर किटकनाशक फवारणी करण्याची वेळ आली आहे. स्पटेंबरपर्यंत चांगला आणि जोमाचा पाऊस होतो.

दरम्यान, यावर्षीही कमी दिवसात जास्त पाऊस झाला आहे. त्यानंतर आता दीर्घ विश्रांती घेतली आहे. दोन दिवसांपासून अधूनमधून येणाऱ्या जोरदार सरीव्यतिरिक्त दिवसभर उन्हाचा तडाखा जाणवत आहे.

उसावर तांबेरा तर भुईमुगाला हुमणी लागली आहे. सध्या अजूनही पावसाची गरज आहे. जोराचा पाऊस होत नाही तोपर्यंत हुमणी किंवा तांबेरा रोग कमी होण्यास मदत होणार नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

सध्याचा पाणीसाठा टीएमसीमध्ये

राधानगरी ७.९५, तुळशी ३.४३, वारणा ३०.३६, दूधगंगा (काळम्मावाडी) २२.०४, कासारी २.४२, कडवी २.४६, कुंभी २.६७, पाटगाव ३.६२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT