Shaktipeeth Highway : शक्तिपीठविरोधी आंदोलन दबावाने दडपण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने करण्याचा निर्धार

CM Eknath Shinde : हातकणंगलेमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडल्याचे खोटे गुन्हे शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आले.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highwayagrowon
Published on
Updated on

Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिस बळाचा वापर सुरू आहे. शासन पोलिसांच्या दंडूकशाहीने हे आंदोलन मोडून काढण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीने केला. याबाबतचे निवेदन समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना दिले. गुरुवारी (ता. २२) शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समिती मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने करणार असल्याचा इशाराही निवेदनातून दिला आहे.

निवेदनातील माहितीनुसार, जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात आंदोलन करण्याचा जनतेला अधिकार आहे. गेल्या चार महिन्यांपासून शक्तिपीठ महामार्गाला जिल्ह्यातील शेतकरी विरोध करत आहेत; मात्र त्यांच्या मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले आहे. याउलट आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलीस फोन करून अनावश्यक माहिती विचारतात. त्यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न करतात.

हातकणंगलेमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडल्याचे खोटे गुन्हे शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आले. शासन पोलिसांच्या दंडूकशाहीचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.

Shaktipeeth Highway
Kolhapur Coopertive Societies : सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा महिन्याअखेरीस, मंजूर, नामंजूरने सभा गाजणार

निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, सम्राट मोरे, शिवाजी मगदूम, प्रकाश पाटील, आनंदा पाटील, के. डी. पाटील, शिवाजी पाटील, तानाजी भोसले, दिनकर पाटोळे, पांडुरंग पाटील, संग्राम वडणगेकर, संजय कदम, प्रशांत कदम यांसह विविध तालुक्यांतील शेतकरी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने करणार

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाहीत. शेतकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागू नये यासाठी कोल्हापूर दौऱ्याची तारीख बदलत आहेत; मात्र शक्तिपीठविरोधी संघर्ष समिती शांततेच्या आणि संविधानाच्या मार्गाने मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने करणार आहे, असा इशारा निवेदनातून दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com